Join us  

'बावले उतावले'च्‍या सेटवर शिवानी बदोनीचे अश्रू झाले अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 12:16 PM

शिवानीने नेहमीच एन्‍टरटेन्‍मेंट इंडस्‍ट्रीमध्‍ये येण्‍याचे स्‍वप्‍न पाहिले होते. हल्‍लीच तिने आपला शो 'बावले उतावले'चा पहिला प्रोमो पाहिला,  तो पाहुन ती खूपच खूश झाली.

ठळक मुद्देशिवानी 'बावले उतावले'मध्‍ये फुंटीची भूमिका साकारत आहे.

चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्‍ट्रीमध्‍ये काम करण्‍याचे स्‍वप्‍न बरेच लोक बघतात, पण काही लोकांचेच हे स्‍वप्‍न पूर्ण होते. शिवानी बदोनी त्‍यांपैकीच एक आहे, जी सध्‍या सोनी सबच्‍या 'बावले उतावले'मध्‍ये फुंटीची भूमिका साकारत आहे. शिवानीने नेहमीच एन्‍टरटेन्‍मेंट इंडस्‍ट्रीमध्‍ये येण्‍याचे स्‍वप्‍न पाहिले होते. हल्‍लीच तिने आपला शो 'बावले उतावले'चा पहिला प्रोमो पाहिला,  तो पाहुन ती खूपच खूश झाली. आनंदाच्‍या या क्षणी ती इतकी भावुक झाली की, तिच्‍या डोळ्यांत अश्रू तरळले. 

शिवानी म्‍हणाली,' मुख्‍य भूमिका साकारण्‍याचे माझे आधीपासूनचे स्‍वप्‍न होते आणि सोनी सबच्‍या 'बावले उतावले' मध्‍ये फुंटीची भूमिका साकारण्‍यास मिळाल्‍याने माझे हे स्‍वप्‍न प्रत्‍यक्षात साकार झाले. राजन शाही यांच्‍यासारखे निर्माता आणि पारस अरोरा सारखे कलाकार आणि सोनी सब सारख्‍या चॅनेल सोबत काम करताना अत्‍यंत आनंद होत आहे आणि मी याकरिता सर्वांची आभारी आहे. या शोच्‍या  माध्‍यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण करत असल्‍याने मी काहीशी भावूक झाले आहे. 'बावले उतावले'चा पहिला प्रोमो आणि म्‍युझिक व्हिडिओच्‍या लॉन्‍च दरम्‍यान मला भरून आले. ही घटना सेटवर आणि सर्व कलाकार व क्रू सदस्‍यांकरिता आता एक हास्‍यास्‍पद घटना बनली आहे. आता जेव्‍हाही शो नवीन टप्पा गाठतो तेव्‍हा प्रत्‍येकजण टिश्‍यू घेऊन उभा राहतो आणि माझ्या रडण्‍याची प्रतिक्षा करत असल्‍याचे सांगत माझी मस्‍करी करू लागतो.''

ती मध्‍यप्रदेशच्‍या एका लहानशा गावातील एका गोड व साधी मुलगी फुंटीची भूमिका साकारत आहे. फुंटी परफेक्‍ट पतीच्‍या शोधात आहे, जो तिला दुसऱ्याच कुणाच्या तरी सुहागरातच्‍या बेडखाली सापपडतो.

टॅग्स :शिवानी बदोनीसोनी सब