Join us

'शिवा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, होळीच्या निमित्ताने शिवा आणि आशुवर चढेल प्रेमाचा रंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 14:03 IST

Shiva Serial : 'शिवा' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेचा होळी विशेष भाग नुकताच चित्रीत झाला.

झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' मालिका (Shiva Serial) लोकांमध्ये चर्चचा विषय बनली आहे. शिवाचा लूक असो किंवा बिनधास्त स्वभाव लोकांना सगळंच आकर्षित करत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेचा होळी विशेष भाग नुकताच चित्रीत झाला. होळीच्या निमित्ताने शिवा आणि आशुवर प्रेमाचा रंग चढेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

शिवा, आशुची गुंडांच्या तावडीतून सुटका करते आणि तेव्हा तिला हाताला जखम होते तर आशुची शिवासाठी मलमपट्टी करण्याची धडपड पाहून शिवाला मनातून अतिशय आनंद होतोय. अप्पर आणि सायलेंसर हे सगळं बघतात आणि त्यांना वाटत की आशुच शिवाची छान काळजी घेऊ शकतो. शिवाच्या हाताला लागलेल असूनसुद्धा शिवा होळीतुन नारळ काढते. 

रंगपंचमीच्या दिवशी आशु ठरवतो की पहिला रंग माझ्या होणाऱ्या बायकोला लावेन, पण इकडे पाना गँग ठरवते की शिवाला पहिला रंग आशुच लावेल. आशु आणि मांजा वस्तीत येतात तेव्हा पाना गँग आशूला चॅलेंज करते की दम असेल तर शिवाला रंग लावून दाखव. तिकडे आशु रंग लावायला आलेला बघून शिवा पळत सुटते.आशु शिवाला रंग लावू शकेल ? ही होळी शिवा आणि आशुच्या नात्यांमध्ये प्रेमाचा रंग भरेल ? यासाठी शिवाचा होळी विशेष भाग रात्री ९ वाजता पाहायला मिळेल.