Join us  

तुला पाहते रे या मालिकेत लवकरच होणार शिल्पा तुळसकरची एंट्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 4:36 PM

तुला पाहते रे या मालिकेच्या शीर्षक गीतात पहिल्यापासूनच आपल्याला शिल्पा तुळसकर पाहायला मिळत आहे. शिल्पा या मालिकेत विक्रांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

ठळक मुद्देसुबोध भावेने होळीच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये त्याच्यासोबत आपल्याला शिल्पा तुळसकर दिसत आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विक्रांत सरंजामे आणि ईशाची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूपच भावली आणि अल्पावधीतच 'तुला पाहते रे' ही मालिका यशाच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगल्याच भावत आहेत. मात्र नुकताच या मालिकेत प्रेक्षकांना एक ट्वीस्ट पाहायला मिळाला आहे. विक्रांतचे खरे रूप प्रेक्षकांना कळले असून त्याने ईशाशी लग्न का केले हे देखील आता प्रेक्षकांसमोर उघड झाले आहे.

तुला पाहते रे या मालिकेच्या शीर्षक गीतात पहिल्यापासूनच आपल्याला शिल्पा तुळसकर पाहायला मिळत आहे. शिल्पा या मालिकेत विक्रांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या मालिकेत शिल्पाची एंट्री लवकरच होणार असल्याची चर्चा आहे. सुबोध भावेने होळीच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये त्याच्यासोबत आपल्याला शिल्पा तुळसकर दिसत आहे. यावरूनच शिल्पाची तुला पाहते रे या कार्यक्रमात लवकरच एंट्री होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

‘तुला पाहते रे’ ही मालिका नियमितपणे बघणाऱ्यांसाठी कदाचित हा आश्चर्याचा धक्का नसेल. कारण मालिकेच्या शीर्षकगीतात तिची झलक पाहायला मिळतेच. पण आता विक्रांत सरंजामेच्या पत्नीची स्पष्ट ओळख प्रेक्षकांना मालिकेत होणार आहे.  

सुबोध भावेने चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सुबोधने कॉलेज जीवनापासूनच एकांकिकामध्ये काम करायला सुरुवात केली. त्याला त्यावेळी अनेक पारितोषिकं मिळाली होती. त्याने अभिनय करण्यासोबतच दिग्दर्शन देखील केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेला कट्यार काळजात घुसली हा चित्रपट चांगलाच गाजला होता. सध्या त्याची तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. या मालिकेत गायत्री दातार आपल्याला त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेच्या कथानकानुसार नायक आणि नायिकेत खूप वर्षांचे अंतर आहे. खऱ्या आयुष्यातही त्या दोघांमध्ये बरेच अंतर आहे. 

टॅग्स :तुला पाहते रेसुबोध भावे गायत्री दातार