Join us  

शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर दिसणार नव्या अवतारात, जाणून घ्या याबद्दल

By तेजल गावडे | Published: October 07, 2020 6:57 PM

आता शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लवकरच नव्या मालिकेत आणि भूमिकेत दिसणार आहे.

'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता या व्यक्तिरेखेने महाराष्ट्रातील प्रेक्षकाला अक्षरक्षः वेड लावले आहे. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही त्यातील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. रात्रीस खेळ चाले २ संपल्यानंतर शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर भावूक झाली होती. तिने फेसबुकवर लांबलचक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मालिका संपल्यापासून प्रेक्षक शेवंतला खूप मिस करत आहेत. पण आता शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लवकरच नव्या मालिकेत आणि भूमिकेत दिसणार आहे

'झी युवा'वरील आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय'मधून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अपूर्वा पम्मी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. पम्मी या भूमिकेतून अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीन बोल्ड करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेचा जॉनर विनोदी असून पम्मी ही या मालिकेला ग्लॅमरचा तडका देणार आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिचे चाहते तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली.

तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

टॅग्स :अपूर्वा नेमळेकररात्रीस खेळ चाले