Join us  

निर्मात्याने कलाकारांचं मानधन थकवणं हा गुन्हाच शशांत केतकरने व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 2:34 PM

शशांक केतकरने सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केलाय. शशांकच्या रागाला कारणीभूत ठरलं आहे ते म्हणजे कलाकारांना वेळेत मानधन मिळत नसल्याने त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर एक्टिव्ह असणा-या कलाकारांमध्ये सिनेमा आणि टीव्ही कलाकारांचा समावेश असतो. सोशल मीडियावर एक्टिव्ह असणा-या कलाकारांत छोट्या पडद्यावरील सा-यांचा लाडका कलाकार श्री म्हणजे शशांक केतकर याचाही समावेश आहे.शशांक वेळोवेळी आपली मतं सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त करत असतो. नुकतंच शशांकनं सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केलाय. शशांकच्या रागाला कारणीभूत ठरलं आहे ते म्हणजे कलाकारांना वेळेत मानधन मिळत नसल्याने त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

निर्माता कितीही सिनीअर आणि अनुभवी असला तरी मानधन आणि कर थकवणं हा गुन्हाच आहे!!!!!!!!!  त्यांची पैशाची अडचणं, आणि मग आम्ही काय अरबांनी दत्तक घेतलेले कलाकार ? असे सांगत त्याने आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

कोणतीही भूमिका साकारण्यासाठी कलाकार मंडळी बरीच मेहनत घेत असतात. या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा, ती व्यक्तीरेखा जिवंत आणि हुबेहूब वाटावी यासाठी कलाकार बरीच मेहनत घेतो. यासाठी वाट्टेल ते करून ती भूमिका रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थाने जगण्यासाठी कलाकार विशेष कष्ट आणि मेहनत घेतो इतकं सगळे करुनही मानधनाच्याबाबतीत कलाकार मात्र उपेक्षितच राहतो. 

निर्मात्यांना काम आधी हवे असते आणि मानधन देताना तीन महिन्यांनी दिले जाते.गेल्या कित्येक वर्षापासून कलाकारांच्या मानधनाबाबतच्या मुद्द्यांवर अनेकांनी वाचा फोडली आहे. तरीही ही समस्या जैसे थेच आहे. कलाकारांना वेळेतच त्यांचे मानधन मिळायला हवे मात्र तसे होत नाही यापेक्षा दुदैव ते कोणते.कलाकारांना वेळेत मानधन मिळावे एवढीच काय ती माफक अपेक्षा.

टॅग्स :शशांक केतकर