Join us  

शहनाज गिल दिसणार छोट्या पडद्यावर, गायक मिका सिंगला वधू शोधण्यासाठी करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 6:38 PM

गायक मिका सिंग(Mika Singh)ची जिवलग मैत्रीण शहनाज गिल (Shehnaaz Gill) 'स्वयंवर - मिका दी वोटी' या शो मध्ये गायक मिका सिंगला वधू निवडण्यासाठी मदत करणार आहे.

'स्वयंवर - मिका दी वोटी' हा बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शो पैकी एक आहे आणि हा शो १९ जून रोजी स्टार भारतवर लॉन्च होणार आहे. हा शो आपल्या अनोख्या संकल्पनेमुळे खूप चर्चेत आहे आणि आता खास गोष्ट म्हणजे एक अप्रतिम गायिका, अभिनेत्री आणि मिका(Mika Singh)ची खास मैत्रीण शहनाज गिल (Shehnaaz Gill) देखील या शोमध्ये दिसणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. 

वास्तविक, शहनाज मिकाला या रिअॅलिटी शोमध्ये स्वतःसाठी योग्य मत शोधण्यात मदत करेल आणि त्याला अनेक टिप्स देखील देईल. या शोमध्ये या दोघांना पहिल्यांदा एकत्र पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच मजेशीर ठरणार आहे. मिकाच्या लाजाळू आणि गोड स्वभावासह शहनाजचे बबली व्यक्तिमत्त्व नक्कीच चाहत्यांच्या पसंतीस उतरेल. यादरम्यान प्रेक्षकांना शहनाज गिलकडून डान्स परफॉर्मन्सचीही अपेक्षा आहे.

 हा शो अद्याप ऑन-एअर झालेला नसला तरी, मिकाच्या शोला दिवसेंदिवस प्रेक्षकांकडून अधिकाधिक लोकप्रियता मिळत आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत,मिका सिंगने आपल्याला अनेक ब्लॉकबस्टर गाणी दिली आहेत. त्याच्या काही हिट रेकॉर्ड ब्रेकिंग गाण्यांमध्ये सावन में लग गई आग, आंख मारे, पुंगी, ढिंका - चिका या गाण्यांचा समावेश आहे. 'स्वयंवर - मिका दी वोटी' हा शो फक्त स्टार भारतवर हा शो १९ जूनला पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :शेहनाझ गिलमिका सिंग