Join us  

शाहिद कपूरला ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या सेटवर मिळाले सरप्राईज!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 12:06 PM

बॉलीवूडचा अभिनेता शाहीद कपूर ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ'मध्ये विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहे. शाहिद आगामी सिनेमा ‘बत्ती गुल, मीटर चालू’च्या प्रमोशनसाठी याठिकाणी येणार आहे.

ठळक मुद्देशाहिदने यावेळी पंकज कपूर यांच्या काही आठवणी सांगितल्या शाहीद आणि श्रध्दा यांनी छोट्या स्पर्धकांबरोबर नृत्य केल्यावर उत्साह आणखीनच वाढला

लहान मुलांमधील अभिनयगुणांचा शोध घेणाऱ्या ‘झी टीव्ही’वरील ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या रिअ‍ॅलिटी शोमधील मुलांमधील अप्रतिम अभिनयगुण, त्यांची शैली आणि नाट्यमयता यामुळे दर वीकेण्डला प्रेक्षकांना एक पर्वणी मिळते. बॉलीवूडचा अभिनेता शाहीद कपूर विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहे. शाहिद आगामी सिनेमा ‘बत्ती गुल, मीटर चालू’च्या प्रमोशनसाठी श्रध्दा कपूर आणि यामी गौतम या दोन गायिकासुद्धा कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी शाहिदने आपले वडील आणि अभिनेते-दिग्दर्शक पंकज कपूर यांच्या काही आठवणी सांगितल्या.

या कार्यक्रमातील या लहान स्पर्धक मुलांना आपल्या वयाच्या मानाने बराच परिपक्व आणि अप्रतिम अभिनय सहजतेने करताना बघून शाहीद, श्रध्दा आणि यामी हे तिघेही थक्क झाले. या स्पर्धकांचा अभिनय बघूनच केवळ शाहीद चकित झाला असे नव्हे, तर या मुलांनी त्याच्यासाठी केलेल्या एका विशेष गोष्टीमुळे तो भारावून गेला. या कार्यक्रमादरम्यान या लहान मुलांनी शाहीदचा मुलगा झेन याच्यासाठी कपडे, खेळणी आणि इतर काही भेटवस्तू त्याच्याकडे सोपविल्या. या लहान मुलांचे हे सौहार्द पाहून शाहीद खुश झाला आणि त्याने या सर्वांचे वारंवार मनापासून आभार मानले. “तुमच्या या गोष्टीमुळे मी भारावून गेलो आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार,” असे शाहीद म्हणाला. या कार्यक्रमात इतरही अनेक दणकेबाज कार्यक्रम झाले. श्रीशा आणि स्निग्धा यांनी आपल्या भांडखोर पती-पत्नीच्या विनोदी नाटकामुळे प्रेक्षकांना भरपूर हसविले; तर हर्षराज लकी आणि इनायत यांनी सादर केलेल्या यंत्रमानवाच्या अभिनयशैलीची सर्वांनी जोरदार प्रशंसा केली. इतकेच नव्हे, तर ‘मिलेगी मिलेगी’ आणि ‘गोल्ड टम्बा’ या गाण्यांवर शाहीद आणि श्रध्दा कपूर यांनी छोट्या स्पर्धकांबरोबर नृत्य केल्यावर उत्साह आणखीनच वाढला.

टॅग्स :शाहिद कपूरश्रद्धा कपूर