Join us  

सुप्रिया पिळगांवकरने आपल्या ऑनस्क्रीन मुलाला दिले हे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 1:09 PM

शाहीरला त्याच्या कुछ रंग प्यार के ऐसी भी या मालिकेतील या ऑनस्क्रीन आईने म्हणजेच सुप्रिया पिळगांवकर यांनी एक खूप छान गिफ्ट दिले असून हे गिफ्ट त्याला खूप आवडले असल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

ठळक मुद्देइन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये आपल्याला एका गुलाबाच्या कुंडीचा फोटो पाहायला मिळत आहे. हे माझे आतापर्यंत मला मिळालेले सगळ्यात चांगले गिफ्ट... थँक्स माँ... असे त्याने या फोटोसोबत लिहिले आहे.

मालिकांचे चित्रीकरण करत असताना कलाकार दिवसातील १२ ते १४ तास एकमेकांसोबत घालवत असतात. अशावेळी त्यांच्यामध्ये अनेक वेळा खूप चांगली मैत्री होते. अनेकवेळा मालिका संपल्यानंतरही कलाकार कित्येक दिवस एकमेकांसोबत संपर्कात राहातात. कुछ रंग प्यार के ऐसे भी ही मालिका संपून अनेक महिने झाले असले तरी त्यांच्यात खूपच छान नाते आहे.

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील देव, सोनाक्षी या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेने शाहीर शेख आणि एरिका फर्नांडिस यांना रातोरात स्टार बनवले. तसेच या मालिकेतील सुप्रिया पिळगांवकर यांच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका संपून काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेचे फॅन्स या मालिकेला चांगलेच मिस करत आहेत. 

कुछ रंग प्यार के ऐसी भी या मालिकेच्या कलाकारांमध्ये चित्रीकरणाच्यावेळी खूप चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे मालिकेच्या सेटवरचे वातावरण एखाद्या कुटुंबासारखेच असायचे. ही मंडळी आवर्जून त्यांच्या सेटवरच्या धमाल-मस्तीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे. या मालिकेत शाहीर शेख आणि सुप्रिया पिळगांवकर हे मुलगा-आईच्या भूमिकेत झळकले होते. या मालिकेप्रमाणेच खऱ्या आयुष्यात देखील त्यांच्यात खूपच चांगले नाते निर्माण झाले होते. आज मालिका संपून अनेक महिने झाले असले तरी ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. ते वेळ काढून एकमेकांना भेटत असतात. 

शाहीरला त्याच्या कुछ रंग प्यार के ऐसी भी या मालिकेतील या ऑनस्क्रीन आईने म्हणजेच सुप्रिया पिळगांवकर यांनी एक खूप छान गिफ्ट दिले असून हे गिफ्ट त्याला खूप आवडले असल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. त्याने इन्स्टाग्रामला या गिफ्टचा फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या या पोस्टमध्ये आपल्याला एका गुलाबाच्या कुंडीचा फोटो पाहायला मिळत आहे. हे माझे आतापर्यंत मला मिळालेले सगळ्यात चांगले गिफ्ट... थँक्स माँ... असे त्याने या फोटोसोबत लिहिले आहे.

टॅग्स :सुप्रिया पिळगांवकर