Join us  

शाहरूख खानचे छोट्या पडद्यावर कमबॅक, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 6:17 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तो स्टार प्लस वाहिनीवरील ‘टेड टॉक्स इंडिया नई बात’ या कार्यक्रमाचे पुन्हा एकदा सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. या कार्यक्रमाचा दुसरा सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आपले मन फार कुतुहलजनक असून नवनव्या गोष्टी शिकण्याची आपली तयारी असते, असे शाहरूख खानने यापूर्वी वेळोवेळी दाखवून दिले आहे. यावेळी त्याला एका गीतांजली राव या केवळ 13 वर्षांच्या एका मुलीने चकित केले. लोकांचे जीव वाचविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून तिने दाखवून दिले की तंत्रज्ञानाच्या वापरात तुमचे वय आड येत नाही.

गीतांजलीने ‘टेथीस’ नावाच्या एका वाहून नेता येण्याजोग्या यंत्राचा शोध लावला असून ते तयार करण्यास फारसा थर्च येत नाही. त्या यंत्राद्वारे पाणी किती प्रदूषित आहे, ते दिसून येते. ताज्या पाण्याच्या ग्रीक देवतेचे नाव तिने या यंत्राला दिले असून मोबाईलशी जोडलेल्या त्यातील संवेदकाद्वारे आपल्याला तात्काळ पाण्याच्या शुध्दतेची माहिती मिळू शकते.

गीतांजलीने यावेळी टेड टॉकच्या व्यासपिठावर या यंत्राचे प्रात्यक्षिक करून पाण्याची शुध्दता किती आहे, ते सर्वांना दाखवून दिले. सुरुवातीच्या सुरुवातीच्या काळात तिने 'एपिओन' नावाच्या उपकरणाने ओपिओइड व्यसनाचे निदान देखील केले आहे.

तिच्या या प्रयोगाने प्रभावित झालेल्या शाहरूख खानने संगितले, “तिच्या वयाच्या मानाने तिने हे एक थक्क करणारं संशोधन केलं आहे. मी जेव्हा 13 वर्षांचा होतो, तेव्हा सुरक्षेसाठी दरवाजाला नीट कडी लावण्याची सूचना माझे पालक मला करीत असत. पण गीतांजलीसारख्या बुध्दिमान मुलांच्या हाती आपले भवितव्य नक्कीच सुरक्षित आहे, असं मला वाटतं.”

टॅग्स :शाहरुख खानस्टार प्लस