Join us

सात महिन्यातच गाशा गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 17:50 IST

मेरी सासू माँ ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे मन जिंकण्यात अयशस्वी ठरली आहे. या मालिकेचा टीआरपी काही केल्या वाढत नसल्याने ...

मेरी सासू माँ ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे मन जिंकण्यात अयशस्वी ठरली आहे. या मालिकेचा टीआरपी काही केल्या वाढत नसल्याने ही मालिका आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मालिका 26 जानेवारीला सुरू झाली होती आणि आता 26 ऑगस्टला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत नुकतीच सिद्धार्थ अरोराची एंट्री झाली होती. पण त्यामुळेही मालिकेच्या टिआरपीवर काहीही परिणाम झाला नाही. मालिका सुरू झाल्यानंतर केवळ सात महिन्यातच या मालिकेला आपला गाशा गुंडाळावा लागला.