Join us  

अख्ख्या फिजिक्सची वाट लावली रे... ! ‘मन झालं बाजिंद’च्या प्रोमोची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 3:43 PM

काही दिवसांपूर्वी ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आणि प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी एका चुकीवरुन ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे  मन झालं बाजिंद  या नव्या मालिकेत राया आणि कृष्णा या दोघांची प्रेमकथा आहे.  

‘मन झालं बाजिंद’  (Mann Jhala Bajinda) ही राया आणि कृष्णाची प्रेमकहाणी अर्थात प्रेमकथा असलेली मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. खरं तर या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. मालिकेचा पहिला भाग पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या ब-या-वाईट प्रतिक्रिया येत आहेत. यात मालिकेच्या प्रोमोवरचे भन्नाट मीम्सही व्हायरल होत आहेत.  होय, मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी भलतीच खिल्ली उडवली आहे.आता या प्रोमोत खिल्ली उडवण्यासारखं काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्कीच आहे. किमान नेटकऱ्यांनी तरी ते अगदी अचूक पकडलंय.

प्रोमोत मालिकेचे हिरो-हिरोईन अर्थात राया व कृष्णा उंचीवरून खाली पडताना दाखवण्यात आलं आहे. पण इतक्या उंचीवरून पडत असूनही हिरोईनच्या कानातले मात्र जराही हलत नाहीत. हे कसं ? असा प्रश्न म्हणूनचनेटकऱ्यांना पडला आणि काहींनी यावरून या प्रोमोची खिल्ली उडवली. या प्रोमोने न्यूटनचीच नाही तर अख्खा  फिजिक्सची वाट लावलीए अशा आशयाचे एक  मीम चांगलेच व्हायरल होतेय.मालिकेच्या प्रोमोवरचे आणखीही काही मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.

असं आहे कथानक

  मन झालं बाजिंद  या नव्या मालिकेत राया आणि कृष्णा या दोघांची प्रेमकथा आहे.  कृष्णालाआई-वडील नसतात. तिचे मामा आणि मामा कृष्णाला लहानाचं मोठं करतात.  तिला अगदी फुलासारखं जपत असतात. अगदी कृष्णावरचं प्रेम कमी होऊ नये, म्हणून मामा-मामी स्वत:ला मूल होऊन देत नाहीत. कृष्णाच्या डोळ्यातलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते धडपडत असतात. कृष्णाला सीए बनायचं असतं आणि खूप मोठं होऊन मामा-मामींना मदत करायची असते. याच हुशार, संयमी, विचारी कृष्णाच्या आयुष्यात राया येतो. राया आणि कृष्णा यांच्या बेभान, बेधुंद प्रेमाची गोष्ट हळदीचा कारखाना, फुललेली शेती अशा गावाकडील पार्श्वभूमीवर  फुलताना दिसणार आहे.

टॅग्स :झी मराठीटेलिव्हिजन