Join us  

इंडियन आयडॉलच्या मंचावर 'हे' ज्येष्ठ संगीतकार लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 1:34 PM

या वीकएंडच्या ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ विशेष भागात महान संगीतकार प्यारेलालजींनी या भागात उपस्थित राहून कार्यक्रमाचा गौरव वाढवला. स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस पाहून ते थक्क झाले.

ठळक मुद्देस्पर्धकांचे परफॉर्मन्सेस पाहून ते थक्क झाले

या वीकएंडच्या ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ विशेष भागात इंडियन आयडॉल 10 चे सर्वोत्कृष्ट 8 स्पर्धक प्रेक्षकांना आपल्या गाण्यांनी एक सांगीतिक प्रवास घडवून आणतील. महान संगीतकार प्यारेलालजींनी या भागात उपस्थित राहून कार्यक्रमाचा गौरव वाढवला. स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस पाहून ते थक्क झाले. सौम्य चक्रवर्तीने त्यांना विचारले की ‘दिल विल प्यार व्यार’ या गाण्यात ‘अय्या’ शब्द कसा आला, त्यावर प्यारेलालजींनी सांगितले की, गीतात हा गंमतीशीर शब्द लक्ष्मीकांतजींनी घातला होता. प्यारेलालजी म्हणाले की, गीतात वापरलेला ‘अय्या’ हा शब्द खरे तर लक्ष्मीकांतजींच्या एका मराठी मोलकरणीकडून आलेला आहे. गंमत अशी झाली की, लक्ष्मीकांतजींकडे एक मराठी मोलकरीण होती, जिला अय्या म्हणण्याची सवय होती. त्यांना तो शब्द इतका आवडला की, त्यांनी तो शब्द गाण्यात वापरला. यांसारखे अनेक मजेशीर किस्से आहेत, ज्यातून त्यांना संगीताची प्रेरणा झाली आहे. इंडियन आयडॉल 10 च्या सेटवरून प्यारेलालजींनी सांगितले की, “एक दिवस लक्ष्मीकांतजी आले आणि मला म्हणाले की, माझ्याकडे एक नवीन मोलकरीण आली आहे तिला प्रत्येक वाक्यागणिक ‘अय्या’ म्हणण्याची सवय आहे. हा शब्द आपण आपल्या नवीन गाण्यात वापरला तर? अशा प्रकारे हा शब्द या गाण्यात आला.” 

टॅग्स :इंडियन आयडॉल