इशांत घेणार प्रेक्षकांचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 16:37 IST
संकट मोचक महाबली हनुमान या मालिकेत सध्या आपल्याला बालहनुमानाची कथा पाहायला मिळत आहे. या मालिकेत बालहनुमानाची भूमिका साकारणारा इशांत ...
इशांत घेणार प्रेक्षकांचा निरोप
संकट मोचक महाबली हनुमान या मालिकेत सध्या आपल्याला बालहनुमानाची कथा पाहायला मिळत आहे. या मालिकेत बालहनुमानाची भूमिका साकारणारा इशांत भानुशाली हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका बनला आहे. पण इशांतच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका लवकरच लीप घेणार असून इशांत काहीच दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका जून अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लीप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. लीपनंतर या मालिकेत निर्भय वाधवा हनुमानाची भूमिका साकारणार आहे.