Join us

SEE PICS:फॅमिली वेडींगमध्ये कुशल बद्रिकेची धम्माल मस्ती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 13:01 IST

'चला हवा येऊ द्या' या शोमधील विनोदवीर शूटिंगशिवाय ऑफस्क्रीन काय काय करतात हे जाणून घेण्यात रसिकांना बरीच उत्सुकता असते. ...

'चला हवा येऊ द्या' या शोमधील विनोदवीर शूटिंगशिवाय ऑफस्क्रीन काय काय करतात हे जाणून घेण्यात रसिकांना बरीच उत्सुकता असते. सध्या सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळते आहे.लग्नसोहळ्यात प्रत्येकालाच धम्माल मस्ती करायला आवडते. त्याला मराठी कलाकारही अपवाद नाहीत. त्यामुळे सध्या या बँड बाजाच्या तालावर कलाकार मंडळी मस्त लग्नात हजेरी लावून मजा लुटताना दिसतायेत.मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार मंडळींनी स्वतःच्या पसंतीने तर कुणी आपल्या कुटुंबाच्या पसंतीने जोडीदाराची निवड करत लग्नबंधनात अडकले आहेत.त्यामुळे लग्नातील धम्माल काय असते हे प्रत्येकालाच माहिती आहे. हीच धम्माल करण्याची संधी कुणीही सोडत नाहीत.नुकतंच चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रिके यानंही लग्नात अशीच काही धम्माल केली आहे.लग्नसोहळ्यात मजा मस्ती करतानाचे फोटो कुशलने शेअर केले आहेत.शेअर केलेल्या फोटोत तो त्याच्या कुटुंबासोबत एका लग्नसोहळ्यात वेळ घालवताना दिसतो आहे.कुशलसोबत या फोटोंमध्ये त्याची पत्नी आणि मुलेही दिसत आहेत. एरव्ही शूटिंगच्या बिझी शेड्युअलमध्ये कुटुंबासह मजा मस्ती आणि धम्माल करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही.मात्र कुटुंबात होणा-या लग्न सोहळ्यामुळे संपूर्ण कुटुंबासह आणि आपल्या नातेवाईकांना भेटता येते. ब-याच वर्षानंतर गाठीभेटी होतात त्याची मजा काही औरच असते असं कुशल बद्रिकेने म्हटले आहे.Also Read:थुकरटवाडी’तील विनोदवीरांची परदेशवारी,लंडन पॅरिसमधील धम्माल मस्तीचे फोटो श्रेया बुगडेनं केले शेअरसध्या चला हवा येऊ द्या शोने अल्पविराम घेऊन या शोची टीम परदेशवारीवर गेली आहे. लंडन, पॅरिसमध्ये चला हवा येऊ द्या शोच्या टीमनं धम्माल मस्ती केली. या ठिकाणी विविध स्टेज शो या टीमनं केले आहेत. परदेश दौरा असल्यावर धम्माल मस्ती तर होणारच.त्यातच परदेशवारीवर गेलेली टीम चला हवा येऊ द्या या शोची टीम असेल तर तुफान धम्माल मस्ती तर नक्कीच ठरलेलीच नाही का ? आपल्या लौकिकाला साजेशी धम्माल चला हवा येऊ द्या शोच्या विनोदवीरांनी परदेशात अनुभवली.