सेव्ह द स्पॅरो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 15:00 IST
माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी शमिका आणि अभिजीतची जोडी अजून ही प्रेक्षकांच्या पसंतीस असल्याचे ...
सेव्ह द स्पॅरो
माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी शमिका आणि अभिजीतची जोडी अजून ही प्रेक्षकांच्या पसंतीस असल्याचे दिसते. या जोडीने म्हणजेच मृणाल दुसानीस व अभिजीत खांडकेकर या दोन सुंदर मराठी कलाकारांनी जागतिक चिमणी दिन बद्दल सेव्ह द स्पॅरो असा संदेश आपल्या चाहत्यांना दिला आहे. मृणाल म्हणते, आजकालच्या या सिमेंट क्रॉकिटच्या जंगलात लहानपणी सतत कानावर पडणारा चिवचिव हा आवाज हरवत चालला आहे. त्यामुळे आज जागतिक चिमणी दिन यादिवशी या चिमण्यांची संख्या जास्तीत जास्त वाढावी यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याचे देखील गरजेचे आहे. तसेच अभिजीतने देखील या सुंदर पक्ष्यांच्या बाबतीत जनजागृती करणाºया सामाजिक संस्थाचे आभार मानले. }}}}