Join us  

'नवा गडी नवं राज्य' मालिकेत सौरभ गोखलेची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 1:52 PM

Nava Gadi Nava Rajya : 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत,

झी मराठी वरील नवा गडी नवं राज्य (Nava Gadi Nava Rajya ) ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत, कश्यप परुळेकर, अनिता दाते आणि पल्लवी पाटील अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे. ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आता या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे कारण विराज इनामदारची एन्ट्री होणार आहे. या भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले (Saurabh Gokhale) दिसणार आहे.

कॉलेजपासून सर्व गोष्टींमध्ये राघवचा प्रतिस्पर्धी राहिलेला आणि राघवला नेहमी कमी दाखवण्याच्या प्रयत्नात असलेला विराज राघवसाठी काही नवीन आव्हान घेऊन येणार का? राघव या आव्हानांना कसा समोर जाईल? हे पाहणं औत्सुकतेचे ठरणार आहे. अभिनेता सौरभ गोखले विराज इनामदारच्या भूमिकेत दिसणार आहे. सौरभ गोखले हा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने वेगवेगळ्या मालिकेतून आणि चित्रपटातून आपली छाप सोडली आहे.

अखेर टग्या उपोषण सोडतो...

नवा गडी नवं राज्य मालिकेत नुकतेच पाहायला मिळाले की, आनंदीने कर्णिकांच्या घरी येऊन राहावे म्हणून टग्या उपोषणाला बसतो. तो उपोषणाला बसलेला असल्याचे समजल्यावर आनंदी तिकडे येते आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करते. पण तो अजिबात ऐकत नाही. त्यानंतर उपोषणाला बसलेल्या मुलांसाठी आनंदी आमरस पुरी आणते. बाकीचे मुले ते पाहून उपोषण सोडतात. पण टग्या ऐकत नाही. त्यानंतर राघव टग्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो आणि टग्याला ते पटते. मग तो त्याचं उपोषण सोडतो. 

टॅग्स :सौरभ गोखले