Join us  

आई झाल्यानंतर सौम्‍या टंडन पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये असा साधणार समतोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 7:15 AM

अनिता भाभी ऊर्फ सौम्‍या टंडनची &TVचा लोकप्रिय शो 'भाभीजी घर पर हैं'वर परतण्‍याची आतुरतेने प्रतिक्षा करत होते.

ठळक मुद्देसौम्या एक-दोन महिने माझ्या घराजवळील लोकेशनवर शूटिंग करणार आहेसौम्‍याने या शोसाठी शूटिंगला सुरुवात केली आहे

अनिता भाभी ऊर्फ सौम्‍या टंडनची &TVचा लोकप्रिय शो 'भाभीजी घर पर हैं'वर परतण्‍याची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. सुंदर अभिनेत्री सौम्‍या आणि पती सौरभ देवेंद्र सिंग यांच्‍याकडे यावर्षीच्‍या जानेवारी महिन्‍यामध्‍ये बाळाचे आगमन झाले आहे. या छोट्या पाहुण्‍याचे नाव मिरान ठेवण्‍यात आले आहे. सौम्‍याने या शोसाठी शूटिंगला सुरुवात केली आहे आणि पुन्‍हा एकदा ती आपल्‍या आकर्षक व स्‍वतंत्र विचारसरणीच्‍या अनिताच्‍या रुपात दिसणार आहे. आपल्‍या नवीन व ताजातवान्‍या रुपात सौम्‍या आता पुन्‍हा एकदा टेलिव्हिजनवर उत्‍साहात वावरताना दिसणार आहे. तसेच ती आपल्‍या दर्शकांना मनोरंजनपूर्ण हास्‍यसफरीवर घेऊन जाण्‍याकरिता सज्‍ज आहे.

आपल्‍या प्रोफेशनल स्‍वभावाकरिता ओळखल्‍या जाणा-या सौम्‍याने आधीच एपिसोड्सची शूटिंग करुन ठेवली होती, जेणेकरुन तिच्‍या नसण्‍याने शोवर कोणताही प्रभाव पडणार नाही. तिने नेहमीच आपले अष्‍टपैलूत्‍व चांगल्‍याप्रकारे सिद्ध केले आहे आणि आता ती आपल्‍या शूटिंगची जबाबदारी व एक आई असल्‍याने ती जबाबदारी यांमध्‍ये समतोल साधत आहे. तसेच यामध्‍ये तिळमात्रही शंका नाही की ते ती उत्‍तमप्रकारे सांभाळत आहे. सामान्‍यपणे, अशी धारणा आहे की, स्‍त्रीने मुलाला जन्‍म दिल्‍यानंतर तिने इतर गोष्‍टी घाई न करता आपल्‍या सोयीने कराव्‍यात, खासकरुन करियरच्‍या बाबतीत. तथापि, या मानसिकतेला आव्‍हान न देण्‍याचे कोणतेच कारण नाही आणि सौम्‍या हे प्रत्‍यक्ष करुन दाखवण्‍यासाठी पूर्णपणे सज्‍ज आहे!

  सौम्‍या म्‍हणाली, ''माझ्या बाळासोबत सेटवर येण्‍यासाठी मी काहीशी नर्व्‍हस होती, पण निर्माते, खासकरुन मिसेस कोहली आणि &TVची संपूर्ण टीम खूपच छान आहे. त्‍यांच्‍याबरोबरच 'भाभीजी घर पर हैं' चे सर्व कलाकार व क्रू खूपच काळजी घेतात आणि माझे काम त्‍यांनी माझ्यासाठी खूपच सोयीस्‍कर बनवले आहे. मला ते खूपच आवडतात! मी एक-दोन महिने माझ्या घराजवळील लोकेशनवर शूटिंग करणार आहे, जेणेकरुन मी माझ्या बाळाला फीड करु शकेन. हे खरोखरंच छान होणार आहे की, मला पुन्‍हा एकदा इतक्‍या उत्‍कृष्‍ट टीमसोबत काही अत्‍यंत मनोवेधक गेट अप करण्‍यास आणि काही मजेशीर सीन करण्‍यास मिळणार आहे.'' यादरम्‍यान, आई बनल्‍यानंतर सौम्‍या आपल्‍या उत्‍कृष्‍ट रुपांतरणाकरिता सध्‍या चर्चेचा विषय आहे. केवळ दोन महिन्‍यांमध्‍ये सौम्‍याचा फिटनेस दिसून येत आहे. ती एरियल योगा आणि जिम करत आपले वजन कमी करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. सौम्‍याने आपने वजन बरेच कमी केले आहे आणि समर फोटोंसह सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. 

टॅग्स :भाभीजी घर पर हैसौम्या टंडन