Join us  

"किती ही ओव्हर एक्टींग", लिटिल चॅम्प्सचे परीक्षक होतायेत जबरदस्त ट्रोल, भन्नाट मिम्स व्हायर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 12:28 PM

‘सारेगमप लिटिल चॅम्पस’शोमध्ये सहभागी झालेले १४ दमदार स्पर्धक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि पहिल्याच आठवड्यात त्यांच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं.

‘सारेगमप लिटिल चॅम्पस’ शोने रसिकांनी सुरुवातीलाच नापसंतीचा सुर आवळल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर शोमध्ये ज्युरी म्हणून पंचरत्न म्हणजेच प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, आणि रोहित श्याम राऊत झळकत आहेत. तर त्रपट आणि मालिकांमधील आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या मृण्मयीने दिग्दर्शन क्षेत्रात देखील पदार्पण केलं. आता ती सारेगमप लिटिल चॅम्प्सच्य माध्यमातून प्रेक्षकांना सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत आहे.

शोमध्ये सहभागी झालेले १४ दमदार स्पर्धक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि पहिल्याच आठवड्यात त्यांच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं. छोटे गायक तसंच अतिशय उत्तम छोटे वादक देखील आपल्याला या पर्वात पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सुरेख गाण्यांनी एक वेगळाच माहोल या लिटिल चॅम्प्सनी तयार केला. पहिल्याच आठवड्यात या स्पर्धकांच्या टॅलेंटची झलक पाहून या कार्यक्रमातील ज्युरी म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि कार्तिकी गायकवाड  या यांच्यासाठी परीक्षण करणंही आव्हानात्मकच होते. 

 

 

शोमध्ये स्पर्धकांचे टॅलेंड पाहून रसिक त्यांचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे पहिल्याच आठवड्यात पंचरत्नांचे सुचना पाहून रसिकांनी सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली. ज्युरीच्या भूमिकेत झळकत असणारे पंचरत्न इतर प्रसिद्ध सेलिब्रेटींची कॉपी करतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात मजेशीर खिल्ली उडवणारे मिम्सही व्हायरल होत आहेत. 

कार्तिकी गायकवाडची तुलना नेक्का कक्कर,रोहित राऊत अवधूत गुप्ते, तर प्रथमेश लघाटे महेश काळे यांना कॉपी करतात असे वाटते, मुग्धा आणि आर्या यांच्यावरही अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक खूपच टॅलेंटेड आहेत. पण ज्युरीचं त्यांच्यापुढे ओव्हर अॅक्टींग करतात असे नेटीझन्स म्हणताना दिसत आहेत. 

टॅग्स :रोहित राऊतआर्या आंबेकर