Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सान्या इराणी आणि बरुण सोबतीची जोडी पुन्हा जमणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 10:33 IST

इस प्यार को क्या नाम दूँ ही मालिका चांगलीच गाजली होती आणि या मालिकेतील सान्या आणि बरुणच्या जोडीचे चांगलेच ...

इस प्यार को क्या नाम दूँ ही मालिका चांगलीच गाजली होती आणि या मालिकेतील सान्या आणि बरुणच्या जोडीचे चांगलेच कौतुक झाले होते. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये सान्या आणि बरुण यांनी काम न केल्याने प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे या मालिकेच्या निर्मात्यांनी तिसऱ्या सिझनमध्ये बरुणला परत आणले. पण तिसऱ्या सिझनमध्ये बरुण आणि सान्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला न मिळणार असल्याने त्यांचे फॅन्स चांगलेच दुःखी झाले आहेत. सान्या इराणी आणि बरुण सोबती यांच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. सान्या इराणी इस प्यार को क्या नाम दूँ 3 या मालिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. सान्या गेल्या कित्येक महिन्यांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. ती काव्या की प्रार्थना या मालिकेद्वारे कमबॅक करणार असल्याचे म्हटले जात होते. पण ही मालिका सुरू व्हायला सतत उशीर होत असल्याने सान्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ती इस प्यार को क्या नाम दूँ 3 या मालिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे.इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत शिवानी तोमर प्रमुख भूमिकेत झळकत असून या मालिकेचा ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्यामुळे सान्या या मालिकेत कोणती भूमिका साकारणार हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. ही मालिका सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी सान्याची एंट्री होणार असून या मालिकेत बरुण, सान्या आणि शिवानी यांच्यामध्ये प्रेमत्रिकोण दाखवला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.सान्याची मालिकेत खरी एंट्री होते की केवळ ही एक अफवा आहे हे प्रेक्षकांना काहीच दिवसांत कळेल.