Join us  

संजीदा शेखने 'या' मालिकेत दाखविले तिचे नृत्य कौशल्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 7:19 PM

'तंत्र' मालिकेने त्यातील रहस्यमय आणि लक्षवेधक कथेने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. सध्या खन्ना कुटुंब जलसा या त्यांच्या स्वप्नमय घरात प्रवेश करण्याचा जल्लोषात आहेत.

ठळक मुद्दे संजीदाने त्या गाण्याची कोरियोग्राफी स्वत: केली आहे

कलर्सवरील 'तंत्र' मालिकेने त्यातील रहस्यमय आणि लक्षवेधक कथेने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. ही कथा खन्ना कुटुंबाच्या भोवती फिरत रहाते जे भयानक तंत्राच्या जाळ्यात सापडले आहेत. सध्या चालू असलेल्या ट्रॅक मध्ये, खन्ना कुटुंब जलसा या त्यांच्या स्वप्नमय घरात प्रवेश करण्याचा जल्लोष करत आहेत आणि त्यांनी एका पार्टीचे आयोजन देखील केले आहे. हा समारंभ शानदार बनविण्यासाठी प्रसिध्द अभिनेत्री संजीदा शेख अक्स सिनेमातील विशेष गाण्यावर डान्स करणार आहे. या विशिष्ट प्रसंगासाठी संजीदाने त्या गाण्याची कोरियोग्राफी स्वत: केली आहे.

यावर बोलताना, संजीदा शेख म्हणाली, “मी तंत्रचे दोन एपिसोड पाहिले आहेत आणि त्यातील रहस्यमयतेने मला ते लक्षवेधक वाटले. या मालिकेत दाखविलेल्या कंटेंट मला आवडला आहे, तो अतिशय वेगळा आणि पाथब्रेकिंग आहे त्यामुळे मी या शोचा एक हिस्सा होण्यासाठी प्रयत्न केला. या विशेष भूमिकेमध्ये मला डान्स करण्याची संधी मिळाली. जी गोष्ट मला नेहमी करायला आवडते. या डान्ससाठी माझे दिसणे काहीसे मोहक, आकर्षक आहे. या सीनचे चित्रीकरण करत असताना मला खूप छान वाटले. या शोमधील कलाकार अतिशय प्रेमळ असल्यामुळे मला त्यांना भेटून आनंद झाला.'' हे कुटुंब पार्टीचा आनंद घेत असताना, ते घर त्याची शक्ती दाखवू लागते. हे कुटुंब एकत्र उभे राहू शकेल का आणि त्यांच्या जीवाला धोका असणारे संकट ओळखू शकतील का किंवा तंत्रामुळे हे कुटुंब मोडून पडेल का?