Join us

संजय जाधव बनणार फ्रेशर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 12:22 IST

 दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने तरूणांचा आयकॉन बनलेला  दिग्दर्शक संजय जाधव हा लकरच फ्रेशर्स ही मालिका घेऊन येत आहे. ...

 दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने तरूणांचा आयकॉन बनलेला  दिग्दर्शक संजय जाधव हा लकरच फ्रेशर्स ही मालिका घेऊन येत आहे. यापूर्वी संजयने दुनियादारी, गुरू यांसारखे तरूणांच्या विषयांशी संबंधित विषय घेऊन तरूणांना आकर्षित केले आहे. आता देखील, संजय तरूणांशी संबंधित फ्रेशर्स ही मालिका करण्यास सज्ज झाला आहे. या मालिकेचे दिग्दर्शन त्याने केले असून ही मालिका झी युवा या वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे. ७ फ्रेशर्सची अतरंगी यारी दाखवणारी फ्रेशर्स ही मालिका २२ आॅगस्टपासून सुरू होणार आहे.