Join us  

संग्राम समेळने केलेली 'ही' गोष्ट 'ललित २०५'साठी येतेय कामी, जाणून घेण्यासाठी क्लिक करा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 6:30 AM

'ललित २०५' या मालिकेत नील राजाध्यक्षची भूमिका साकारणाऱ्या संग्राम समेळने मालिकेत नुकताच एक फायटिंग सीक्वन्स शूट केला.

ठळक मुद्देसंग्रामने घेतलंय लाठीकाठी खेळाचे प्रशिक्षण

स्टार प्रवाहवरील 'ललित २०५' या मालिकेत नील राजाध्यक्षची भूमिका साकारणाऱ्या संग्राम समेळने मालिकेत नुकताच एक फायटिंग सीक्वन्स शूट केला. विशेष बाब म्हणजे गुंडांशी दोन हात करण्याचा हा सीन त्याने पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केला. फायटिंग सीक्वन्स साकारताना संग्रामच्या कामी आला तो त्याचा लाठीकाठी खेळाचा अनुभव. 

पारंपरिक साहसी खेळ समजला जाणाऱ्या लाठीकाठी खेळाचे संग्रामने प्रशिक्षण घेतले आहे. विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २ वर्ष तो याचे प्रशिक्षण घेतो आहे. आवड जोपासण्यासाठी त्याने लाठीकाठी शिकण्याचा ध्यास घेतला आणि तो चिकाटीने पूर्णही केला. मालिकेत जेव्हा फायटिंग सीक्वन्स करणार असल्याची माहिती मिळाली तेव्हा हाच अनुभव संग्रामच्या कामी आला आणि त्याने सीन उत्तमरित्या साकारला.या सीनविषयी सांगताना संग्राम म्हणाला, ‘मी लाठीकाठी शिकल्यामुळे सीन करणे मला खूप सोपे गेले. मी सऱ्हाईतपणे मारामारीचा सीन केला मात्र माझ्यासमोर उभ्या ठाकलेल्या गुंडांची पळता भुई थोडी झाली कारण त्यांना काठीचा खरोखरच फटका बसेल की काय याची भीती होती. सीन ओके होताच सर्वांनीच माझे भरभरुन कौतुक केले.’

'ललित २०५' मालिकेतील भैरवी म्हणजे जुन्या नव्या विचारांमधला दुवा. नव्यासोबतच जुन्या रुढी, परंपरा जपणे तिला महत्त्वाचे वाटते. विखुरलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी भैरवीचे अखंड प्रयत्न सुरु आहेत. यासोबतच घरातल्या थोरामोठ्यांचा सन्मान भैरवीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सासू-सुनेच्या नात्याला तिने मैत्रीचे कोंदण दिले आहे. 

टॅग्स :ललित 205संग्राम समेळ