Join us

संदीप आनंद आता दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 12:44 IST

मे आय कम इन मॅडम या मालिकेत संदीप आनंद नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतो. कधी तो शेफच्या भूमिकेत दिसतो ...

मे आय कम इन मॅडम या मालिकेत संदीप आनंद नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतो. कधी तो शेफच्या भूमिकेत दिसतो तर कधी कृष्णाच्या भूमिकेत दिसतो. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना तो एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तो आता या मालिकेत एका बंगाली व्यक्तिची व्यक्तिरेखा साकारणार असल्याचे कळतेय. आता साजन मालिकेत बंगाली बनतोय असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. साजन बंगाली बनत नसून त्याचा मालिकेत डबल रोल पाहायला मिळणार आहे. साजनसारखा दिसणाऱ्या एक व्यक्तीची लवकरच मालिकेत एंट्री होणार असून तो बंगाली असणार आहे. साजनसारखा दिसणारा हा व्यक्ती सगळ्यात पहिल्यांदा साजनलाच दिसणार आहे. त्याला पाहून साजनला आश्चर्याचा चांगलाच धक्का बसणार आहे. या मालिकेची लोकप्रियता बंगाली लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याने साजनचा नवा लूक हा बंगाली व्यक्तीचाच असणार असल्याचे म्हटले जात आहे.या मालिकेत संजना प्रेक्षकांना डबल रोल साकारताना पाहायला मिळते. आता तिच्यानंतर साजनदेखील डबल रोल साकारणार असल्याने या मालिकेच्या फॅन्सना नक्कीच आनंद होईल. या मालिकेत साजनची भूमिका साकारत असलेला संदीप आनंद या मालिकेला रामराम ठोकणार अशी दरम्यानच्या काळात चर्चा होती. त्याला काही चित्रपटाच्या ऑफर्स आल्यामुळे त्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात होते. पण सध्या तरी तो मालिका सोडणार नसल्याचे कळतेय. वेगवेगळ्या भूमिकांमधून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. प्रेक्षकांना त्याची ही नवी भूमिकादेखील आवडेल अशी त्याला खात्री आहे.