Join us

​हर शाख पे उल्लू बैठा है या मालिकेतील समता सागर आणि मेलिसा पैसची जमली गट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 16:20 IST

‘स्टार प्लस’ आपल्या वाहिनीवर एक सर्वार्थाने वेगळ्या प्रकारची मालिका प्रसारित करत असून काल्पनिक मनोरंजनाच्या क्षेत्रात अशा राजकीय विडंबनात्मक मालिका ...

‘स्टार प्लस’ आपल्या वाहिनीवर एक सर्वार्थाने वेगळ्या प्रकारची मालिका प्रसारित करत असून काल्पनिक मनोरंजनाच्या क्षेत्रात अशा राजकीय विडंबनात्मक मालिका दुर्मिळ आहेत. टीव्हीवरील राजकीय विडंबनाची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे आपल्याच चुकांवर हसण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे. ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही आगामी मालिका देशातील विद्यमान राजकीय स्थितीवर तिरकस भाष्य सादर करत आहे. राजकीय विडंबनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’या कार्यक्रमातील एक लोकप्रिय उमेदवार राजीव निगम हे या मालिकेत चैतूलाल या भ्रष्ट आणि विनोदी राजकीय नेत्याची भूमिका रंगवत आहेत. राजीवच्या या नव्या मालिकेला प्रेक्षकांच्या खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. तसेच या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आवडत आहेत. ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेने इंडस्ट्रीमध्ये आपले असे वलय निर्माण केले आहे. अभिनेत्री समता सागर यात इमली देवी म्हणजेच सीएम चैतू लालच्या बायकोची भूमिका साकारत असून तिची आणि तिची सहकलाकार मेलिसा पैस ऊर्फ मलाई चैतू लालची वहिनी यांची छान गट्टी जमली आहे. याविषयी ती सांगते, “माझी आणि मेलिसाची छान मैत्री जमली आहे. दोन अभिनेत्री मैत्रिणी असूच शकत नाहीत असे कोण म्हणतं? अगदी पहिल्या दिवसापासून आमची मस्त गट्टी जमली आहे. आम्ही एकमेकींना अभिनयाच्या आणि मेकअपच्या टिप्स देतो. एक अभिनेत्री म्हणून मला ती आवडते आणि मला छान वाटतंय की या शोमुळे आम्ही एकत्र आलो. माझ्या आयुष्यातील चढ-उतारांच्या वेळेस मी सल्ला घ्यायला तिच्याकडेच जाते. आशा करते की आमची मैत्री अशीच उत्तरोत्तर वाढत जाईल.समताची ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेतील अन्य सहकलाकारांसोबतही चांगली मैत्री झाली आहे. मेलिसा तर तिची खास दोस्त आहे आणि आशा आहे की ऑनस्क्रीन बहिणी असलेल्या या दोघी ऑफस्क्रीनही कायम छान मैत्रिणीच राहतील.Also Read : लोकांना हसविणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय- राजीव निगम