Join us  

कोरोना नव्हे,आपल्याकडच्या ढिसाळ आरोग्य यंत्रणामुळे जीव गेला, वडिलांच्या निधनानंतर संभावना सेठ भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 6:48 PM

हॉस्पिटलमधून राहुल वोहराचा व्हिडीओ समोर आला होता. यांत ऑक्सिजन मास्क लावलेला दिसतोय. "आजच्या काळात याची किंमत आहे. त्याशिवाय रुग्ण तडफडतो," असे राहुल म्हणत होता

कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत आहे. इंजेक्शन, बेड्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरजुंसाठी बेड्स आणि औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्याकडची आरोग्य व्यवस्था त्यासाठी अपयशी ठरत आहेत. वाढत्या करोना रुग्णांमुळे ऑक्सिजन, बेडस्, औषधांचा तुडवडा निर्माण झालाय. अशात रुग्णांचेही हाल होत आहे. वेळीच त्यांना उपचार मिळत नसल्यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. कोरोनाबाधित रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुरेशा व्यवस्था नाही. सर्वसामान्याप्रमाणे सेलिब्रेटींना देखील त्यांच्या जवळच्या व्यक्तींना वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने त्यांना गमवावे लागले आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता-युट्युबर राहुल वोहराचेही ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला. राहुलच्या निधनानंतर पत्नीने आपल्याकडच्या आरोग्य यंत्रणाच राहुलच्या मृत्युला जबाबदार असल्याचे म्हटले होते. 

हॉस्पिटलमधून राहुल वोहराचा व्हिडीओ समोर आला होता. यांत ऑक्सिजन मास्क लावलेला दिसतोय. "आजच्या काळात याची किंमत आहे. त्याशिवाय रुग्ण तडफडतो," असे राहुल म्हणत होता. राहुल चेह-यावरचा मास्क बाजुला काढत म्हणतो, "यातून काहीच येत नाहीये," मास्कमधून ऑक्सिजन येत नसल्याचे सांगितल्यावरही कुणी येऊन लक्ष देत नाही, असे राहुलने या व्हिडिओत सांगितले होते. त्याच्या या व्हिडीओमुळे त्याने रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आणला होता.

त्याचपाठोपाठ आता संभावना सेठनेही हाच मुद्दा उपस्थित केला आहे. वडिलांच्या निधनाच्या तीन दिवसांनंतर संभावनाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शन दिली आहे. संभावनाने म्हटले आहे की, तिच्या वडिलांचे प्राण वाचवता आले असते. कोविडमुळेच त्यांचे निधन झाले नाही.तिच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा ढिसाळ आरोग्य यंत्रणाच जबाबदार असल्याचे तिने म्हटले आहे.  

संभावना सेठच्या वडिलांचे कोरोनाची लागण झाली होती. जेव्हा त्यांची प्रकृती खालावत जात होती. तेव्हा आयसीयुमध्ये एडमिट करण्यासाठी बेडही उपलब्ध नव्हते. शेवटी सोशल मीडियावर तिने मदत मागितली होती. अखेर ९ मे रोजी त्यांचे निधन झाले.