Join us  

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत शंभूराजे करणार औरंगजेबाचा वध?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 2:00 PM

एकीकडे रायगडावर भवानी बाईंच्या लग्नाचे सनई चौघडे वाजत आहेत तर दुसरीकडे बुऱ्हाणपुरात शंभूराजे वाघाच्या गुहेत शिरून वाघाचा म्हणजे औरंगजेबाचा वध करायला निघाले आहेत.

ठळक मुद्देशंभूराजांनी भवानी बाईंना 'तुमच्या वरातीचा मेणा आम्हीच उचलणार' असा शब्द दिलाय पण त्यांच्या लग्नाच्या दिवशीच शंभूराजे आणि औरंगजेब समोरासमोर येणार आहेत

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. कुठलीही ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांना पटेल अशी निभावणं हे कलाकारासाठी आव्हानात्मक असतं आणि तीच भूमिका सहजरित्या निभावणं हे त्या कलाकाराचं यश आहे. 

मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढे उभा करण्यात यशस्वी झालंय. स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका एका विलक्षण वळणावर आली आहे. एकीकडे रायगडावर भवानी बाईंच्या लग्नाचे सनई चौघडे वाजत आहेत तर दुसरीकडे बुऱ्हाणपुरात शंभूराजे वाघाच्या गुहेत शिरून वाघाचा म्हणजे औरंगजेबाचा वध करायला निघाले आहेत. पहिल्या अयशस्वी प्रयत्नानंतर त्यांनी कोणत्याही परिस्तिथीत माघार घ्यायची नाही हा त्यांनी निर्धार केला आहे.

शंभूराजांच्या या मोहिमेमुळे रायगडावर मात्र येसूबाईंच्या जीवाला घोर लागलाय... कारण शंभूराजे रायगडावर नाही आहेत हे गुपित ठेऊन लग्नाचे सगळे विधी नीट पार पडायची जबाबदारी येसूबाईंवर आहे. शंभूराजांनी भवानी बाईंना 'तुमच्या वरातीचा मेणा आम्हीच उचलणार' असा शब्द दिलाय पण त्यांच्या लग्नाच्या दिवशीच शंभूराजे आणि औरंगजेब समोरासमोर येणार आहेत आणि हा विलक्षण प्रसंग प्रेक्षकांना रविवार २७ ऑक्टोबर रात्री ९ वाजता प्रसारित होणाऱ्या १ तासाच्या विशेष भागात अनुभवायला मिळेल.

टॅग्स :स्वराज्य रक्षक संभाजीझी मराठी