Join us

सलमानचा स्कूलमेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 15:31 IST

इश्कबाज या मालिकेत तेज सिंग ऑबेरॉय ही भूमिका साकारणारा अभिनेता महेश ठाकूरचे शिक्षण वांद्रे येथे झालेले आहे. महेशचे वडील ...

इश्कबाज या मालिकेत तेज सिंग ऑबेरॉय ही भूमिका साकारणारा अभिनेता महेश ठाकूरचे शिक्षण वांद्रे येथे झालेले आहे. महेशचे वडील हे अमेरिकेत राहात होते तर महेश त्याच्या आजीकडे मुंबईत लहानाचा मोठा झाला. त्याचे शिक्षण वांद्रे येथील एका शाळेत झाले. सलमानदेखील वांद्र्यातील त्याच शाळेत शिकत होता. याविषयी महेश सांगतो, "मी आणि सलमान एकाच शाळेत होतो. सलमान मला दोन ते तीन वर्षं सिनियर होता." सलमानसोबत महेशने हम साथ साथ है या चित्रपटात कामदेखील केले होते.