Join us  

PPE किट घालून रस्त्यावर फिर फिरते अभिनेत्री, सलमान खानच्या सिनेमाचे करते प्रमोशन !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 10:17 AM

नुकतेच सिनेमाच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे आता सिनेमा पाहण्यासाठी सलमानच्या चाहत्यांची नक्कीच उत्सुकता वाढली असणार हे मात्र नक्की.

गेल्या काही वर्षांत सिनेमाचे हटके प्रमोशन करण्यात येत असल्याचे सा-यांनाच माहितीय, हटके प्रमोशन करत रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. अशात आता बहुप्रतिक्षित सलमान खानचा सिनेमा राधे रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

नुकतेच सिनेमाच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे आता सिनेमा पाहण्यासाठी सलमानच्या चाहत्यांची नक्कीच उत्सुकता वाढली असणार हे मात्र नक्की. अशात मात्र ड्रामेबाज राखी सावंतही सलमाच्या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसते. 

इतरांना मास्क लावा, काळजी घ्या, घराबाहेर पडू नका सांगत फिरणारी राखी आता चक्क पीपीई किट घालून रस्त्यावर उतरली आहे. रस्त्यावर प्रत्येकाला थांबवून थांबवून सलमानचा राधे सिनेमा पाहण्यासाठी सांगत असल्याचे समोर आलेल्या व्हिडीओत पाहायला मिळतंय.

 

तसेच अशावेळी पोलिसांचीही तिला भीती वाटतेय, पोलिसांनी जर तिला पाहिले की, तिच्यामुळे रस्त्यावर गर्दी होत आहे तर पोलिसच मला मारतील असेही सांगताना दिसत आहे. सलमानने राखीला तिच्या आईच्या ऑपरेशनसाठी मदत केली आहे. आता तिच्या आईवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे राखीची आई आता लवकरात लवकर ठणठणीत बरी होणार आहे. याचे सारे श्रेय नक्कीच सलमानला जाते. 

राखी ‘बिग बॉस 14’मध्ये असतानाच तिला आपल्या आईच्या आजाराबद्दल कळले होते.आईच्या उपचारासाठी राखीजवळ पैसे नव्हते. शोमधून कमावलेल्या पैशातून ती आईचा उपचार करू इच्छित होती. अशावेळी सलमान खान तिच्या मदतीला धावून आला.

 

राखीच्या आईच्या उपचाराचा सर्व खर्च त्याने आपल्या खांद्यावर घेतला आणि काल राखीच्या आईवर यशस्वी शस्त्रक्रिया करत, तिच्या पोटातील कॅन्सरचा ट्युमर बाहेर काढण्यात आला. आई आता कॅन्सरमुक्त झाली, हे पाहून राखी भावूक झाली. सलमानचे आभार मानताना तिला शब्द कमी पडलेत आणि ती ढसाढसा रडू लागली. अगदी भररस्त्यावर डोकं टेकत, हात जोडतं तिने सलमानचे नाव घेत त्याचे आभार मानलेत.

टॅग्स :राखी सावंतसलमान खान