सलमान खानची दुश्मन प्रियंका जग्गा बनली Bollywood Heroine
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 15:43 IST
बॉलिवूडमध्ये ज्याच्या नावाचा डंका वाजतो, तो अभिनेता म्हणजे सलमान खान होय, हे नाकारणे मुश्कील आहे. कारण एखाद्याचे करिअर घडवायचे ...
सलमान खानची दुश्मन प्रियंका जग्गा बनली Bollywood Heroine
बॉलिवूडमध्ये ज्याच्या नावाचा डंका वाजतो, तो अभिनेता म्हणजे सलमान खान होय, हे नाकारणे मुश्कील आहे. कारण एखाद्याचे करिअर घडवायचे अन् बिघडवायचे हे त्याला उत्तमप्रकारे ज्ञात आहे. त्यामुळेच जो भाईजानच्या अर्थात सलमानच्या जवळ असेल तो बॉलिवूडचा स्टार बनतो तर जो दुश्मनी पत्करतो तो बॉलिवूडमधूनच हद्दपार होतो, हा आजवरचा इतिहास आहे. मात्र या इतिहासाला आता तडा जाताना दिसत आहे. कारण बिग बॉसच्या घरात सलमानशी पंगा घेणाºया प्रियंका जग्गाला चक्क एका सिनेमाची आॅफर मिळाली आहे. ">http:// बिग बॉस १० ची एक्स स्पर्धक प्रियंका जग्गा हिला घरातील तिच्या गलिच्छ वर्तणुकीमुळे सलमानने त्याच्या अंदाजात बाहेर काढले होते. त्याचबरोबर तुला बिग बॉसच्या शोमध्येच नव्हे तर पुन्हा कलर्स चॅनेलवरदेखील दिसू देणार नसल्याचा दम दिला होता. अर्थात सलमानने दिलेला दम पोकळ असण्याचे कारणच नसल्याने प्रियंका जग्गा पुन्हा पडद्यावर झळकणार नाही, हे निश्चित समजले जात होते. मात्र प्रियंका चक्क मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने सलमानला आश्चर्याचा धक्का बसणार नसेल तरच नवल. बिग बॉसच्या घरात इंडियावाले म्हणून आलेल्या प्रियंका जग्गा हिचा घरातील प्रवास खूपच वादग्रस्त राहिला. पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडलेल्या प्रियंकाला वाइल्ड कार्डद्वारे पुन्हा घरात एंट्री देण्यात आली होती. त्यानंतर तिने घरात असा काही उच्छाद मांडला होता की, ज्यामुळे शोच्या निर्मात्यांना अन् दस्तुरखुद्द सलमान खानला तिला घराबाहेर काढावे लागले. मात्र घरातील तिची ही कृती अजिबात माफीच्या योग्य नसल्याने सलमानने त्याच्या स्टाइलमध्ये तिची घरातून हकालपट्टी केली होती. ‘लिव्ह माय होम’ अशा शब्दात त्याने तिला घराबाहेर काढले होते. प्रियंकानेदेखील तडकाफडकी घराबाहेर पडून शोच्या निर्मात्यांवर अन् सलमान खानवर आरोपांची बरसात केली होती. त्याचबरोबर ती आता इंडस्ट्रीपासून कायमची दूर झाली, असा कयासदेखील लावला जात होता. मात्र ती पुन्हा एकदा पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे. याची खबर खुद्द प्रियंकानेच तिच्या फेसबुक अकाउंटवरून दिली आहे. प्रियंका ज्या सिनेमातून डेब्यू करणार आहे, त्या सिनेमाचे निर्माते इंदर कुमार असून, दिग्दर्शक राधे मोहन आहेत. यापेक्षा अधिक डिटेल्स अद्यापपर्यंत समोर आलेल्या नाहीत. खरं तर प्रियंका गेल्या काही वर्षांपासून अभिनयाचे धडे घेत आहेत. अशात तिला बिग बॉसचे व्यासपीठ मिळाल्याने ती लाइमलाइटमध्ये आली आहे. काही वर्षांपासून ती एका पंजाबी गाण्यातदेखील झळकली होती. आता सिनेमातही झळकणार असल्याने ती उत्साहित दिसत आहे. मात्र यामुळे भाईजान चांगलेच संतापतील यात काही दुमत नाही.