Join us

​कॉमेडी हाय स्कूलमध्ये हजेरी लावण्यासाठी सलमान खानने घेतले इतके करोड रूपये... वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 16:11 IST

डिस्कव्हरी जीत वाहिनीवर कॉमेडी हाय स्कूल हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक राम कपूर असून या ...

डिस्कव्हरी जीत वाहिनीवर कॉमेडी हाय स्कूल हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक राम कपूर असून या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमिअर एपिसोड प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हजेरी लावणार आहे. सलमान खानने आजवर बिग बॉस, दस का दम यांसारख्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालकाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे सलमानसाठी छोटा पडदा नवीन नाहीये. तसेच सलमानने तारक मेहता का उल्टा चष्मा, कुमकुम भाग्य यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली आहे. आता तो प्रेक्षकांना कॉमेडी हाय स्कूलमध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमात सलमानला बोलवण्यासाठी या कार्यक्रमाच्या टीमने चांगलीच रक्कम मोजली आहे. सलमान खान हा आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. तो एका चित्रपटात काम करण्यासाठी करोडो रूपये घेतो. एवढेच नव्हे तर बिग बॉस या कार्यक्रमाच्या एका भागासाठी तो ११ करोड रुपये आकारतो असे म्हटले जाते. आता तर कॉमेडी हाय स्कूलमध्ये हजेरी लावण्यासाठी त्याने चार करोड रुपये घेतले असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमासाठी सलमानने केवळ तीन तास चित्रीकरणासाठी दिले होते. तीन तासापेक्षा अधिक काळ लागल्यास कार्यक्रमाच्या टीमला प्रत्येक मिनिटासाठी चार करोडपेक्षा अधिक पैसे द्यावे लागणार होते. या कार्यक्रमाच्या टीमने चार कोटीहून अधिक पैसे सलमानला केवळ तीन तासासाठी दिले अशी चर्चा आहे. कॉमेडी हायस्कूलमधून समाज, संस्कृती, शिक्षण आणि वर्तमानातील घडामोडींवर क्लासरूमवर आधारित सेटअपमधून हलक्याफुलक्या पद्धतीने वेध घेतला जातो. ही एक स्वच्छ कॉमेडी असून यात विभिन्न संकल्पनांवर आधारित एपिसोड्‌स असतील. या शाळेमध्ये इंग्रजी, हिंदी, शारीरिक शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास अशा अनेक विषयांचे शिक्षक, एक शिस्तप्रिय मुख्याध्यापक आणि नैतिक व सच्चे ट्रस्टीही आहेत. प्रत्येक आठवड्‌याला वेगवेगळ्‌या अवतारात नावाजलेले सेलिब्रिटीज या शाळेला भेट देतील. या शोमध्ये राम कपूर, गोपाल दत्त, परितोष त्रिपाठी, कृष्णा भट्ट, जसमीत भाटिया आणि दीपक दत्ता अशा ख्यातनाम कलाकारांचा समावेश आहे.Also Read : ​सलमान खानने दस का दमच्या प्रोमोसाठी केले चित्रीकरण