सईने केले सामोसाला बर्थडे विश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 03:27 IST
सामोसा नाव ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते आणि चटपटीत सामोसा खाण्याची नक्कीच इच्छा होते. ...
सईने केले सामोसाला बर्थडे विश
सामोसा नाव ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते आणि चटपटीत सामोसा खाण्याची नक्कीच इच्छा होते. आणि या सामोसाचा बर्थडे आहे म्हटल्यावर थोडे आश्चर्य तर वाटतेच. एवढेच नाही तर सगळ््यांना घायाळ करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने त्या सामोसाला थेट वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गोंधळून जाऊ नका तर हा सामोसा म्हणजे संगीतकार अमित राज आहे. सई अमितलाच सामोसा म्हणते. आज त्याचा वाढदिवस असल्याने तिने त्याला खुप साºया शुभेच्छा दिल्या आहेत. तर आपणही सईच्या या सामोसा फ्रेन्डला हॅपी बर्थडे विश करु.