Join us

सई म्हणते इंडियाच जिंकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 16:46 IST

          इंडिया-पाकिस्तानची मॅच म्हटल्यावर सगळ््यांच्याच ह्रद्याचा ठोका आपोआप वाढतो. आणि त्यातही वर्ल्डकपची मॅच म्हचल्यावर काही ...

          इंडिया-पाकिस्तानची मॅच म्हटल्यावर सगळ््यांच्याच ह्रद्याचा ठोका आपोआप वाढतो. आणि त्यातही वर्ल्डकपची मॅच म्हचल्यावर काही विचारुच नका. फक्त इंडिया-पाक ही मॅच पाहण्यासाठी लोक वेडे असतात. मग यात आपली बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटीफुल सई ताम्हणकर देखील शामील आहे. सई वर इंडिया-पाकिस्तानच्या मॅचचा हँगोवर चांगलाच चढला आहे. यासंदर्भात सीएनएक्स सोबत बोलताना सई म्हणाली, इंडिया पाकिस्तानच्या मॅच ला सगळेच पझेसीव असतात. मी सुधा खुपच एक्सायटेड आहे. या मॅचसाठी मी खास प्लॅनिंगदेखील केले आहे. एवढेच नाही तर सई पुढे म्हणत आहे, ही मॅच आपणच जिंकणार आहोत. आता पाहुयात सईचा हा कॉन्फीडन्स खरा होतोय का. तिने सोशल साईटवर इंडिया-पाक मॅडनेस असे पोस्ट केले असुन त्याच्यासोबत एक पोस्टरदेखील आहे ज्यावर लिहिले आहे. त्यांन शेवटची ओव्हर जोगिंदर शर्माला दिली, तेव्हा अख्खी दुनिया म्हणाली, काय .... गिरी आहे ही ... पण वर्ल्ड कप आपणच जिंकलो म्हणजे काय ते कळेल २१ मार्चला सकाळी १० वाजता. आता असे काय गुपित आहे जे सई हाईड करीत आहे ते आपल्याला लवकरच समजेल.