Join us  

बिग बॉस मराठीच्या घरात सई लोकूरने सांगितले तिच्या त्या बॉयफ्रेंडविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 9:16 AM

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या सई लोकूर बिग बॉसच्या घरात स्पर्धकाच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे. बिग बॉसच्या घरात सगळीच मंडळी मजा-मस्ती करताना दिसत आहेत. त्याचसोबत ते एकमेकांची दुःख, एकमेकांच्या आयु्ष्यातील चांगल्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करत आहेत. सई लोकूरने तिच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी बिग बॉसमधील तिच्या मित्रमैत्रिणींना सांगितल्या. तिच्या आयुष्यातील एका ब्लाईंड डेटविषयी मेघा, पुष्कर, आऊ आणि शर्मिष्ठा यांच्याशी गप्पा मारताना तिने सांगितले. सईच्या या ब्लाईंड डेटविषयी ऐकून बिग बॉस मराठीतील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सईने या सगळ्यांशी गप्पा मारताना सांगितले, मी चार वर्षांपासून सिंगल होते. माझ्या आयुष्यात देखील कोणीतरी असावे. आपली काळजी कोणीतरी घ्यावी असे मला देखील वाटत होते. सिंगल असण्याचा मला कंटाळा आला होता. तेव्हा माझ्या एका मित्राला मी माझ्यासाठी बॉयफ्रेंड शोध असे सांगितले होते. त्या मित्राने त्याच्या एका मित्रासोबत माझी डेट ठरवली. त्या मित्राला मी कधीच भेटली नव्हते किंवा त्याच्याशी मी बोलले देखील नव्हते. पण तरीही माझा मित्र माझ्यासाठी योग्यच विचार करेन याची मला खात्री होती. त्यामुळे मी त्या ब्लाईंड डेटला गेले. त्याला भेटण्याच्या आधी मी या अनोळखी मुलासोबत कोणतेही नाते निर्माण करेन असे मला वाटले नव्हते. पण आमच्या दोघांचे ट्युनिंग मस्त जमलं आणि जवळजवळ दीड वर्षं आम्ही नात्यात होतो. पण त्याच्यासोबत आता सईचे ब्रेकअप झालेले आहे. कारण सई आता सिंगल असून ती कोणासोबत देखील नात्यात नाहीये असे तिने अनेक वेळा बिग बॉस मराठीच्या घरात सांगितलेले आहे. तसेच तिचे नुकतेच ब्रेकअप झाले असल्याचा देखील तिने उल्लेख केला होता. तिचे त्याच्यासोबत ब्रेकअप कधी झाले, तसेच तो मुलगा कोण होता, तो मुलगा आता काय करतोय याबद्दल तिने मौन राखणेच पसंत केले आहे.  Also Read : बिग बॉस मराठीची स्पर्धक सई लोकूर खऱ्या आयुष्यात आहे ग्लॅमरस