Join us  

साई बाबांच्या भूमिकेने अबीरमध्ये केला 'हा' बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 12:46 PM

साईंची भूमिका साकारणार्‍या अबीर सूफीची निवड अनेक कलाकारांच्या चाचणीनंतर करण्यात आलेली आहे. या प्रतिभावंत कलाकाराने आपल्या सहकलाकारांजवळ हे कबूल केले की साई बाबांच्या भूमिकेने त्याला पूर्वीपेक्षा अधिक शांत व्यक्ती बनण्यात मदत केली

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई मालिकेत साई बाबांची भूमिका करणार्‍या अबीर सूफीला ही भूमिका करू लागल्यापासून स्वतःच्या व्यक्तिमत्वात अनेक बदल झाले असल्याचे जाणवले आहे. या प्रतिभावंत अभिनेत्याने आपल्या शांत आणि तेजस्वी अभिनय कौशल्याने जागतिक स्तरावर प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. आगामी भागात संपूर्ण सेट एक महत्वाचा प्रसंग साजरा करताना दिसतील, ज्यामध्ये साई बाबा त्यांच्या ध्यानातून जागृत होतील आणि ‘पुनः अवतरित’ होतील. हे दृश्य सौंदर्यात्मकरित्या चित्रित व्हावे असे अबीरला वाटत होते. साईंची भूमिका साकारणार्‍या अबीर सूफीची निवड अनेक कलाकारांच्या चाचणीनंतर करण्यात आलेली आहे. या प्रतिभावंत कलाकाराने आपल्या सहकलाकारांजवळ हे कबूल केले की साई बाबांच्या भूमिकेने त्याला पूर्वीपेक्षा अधिक शांत व्यक्ती बनण्यात मदत केली. साई बाबांच्या शिकवणीने अबीरच्या आयुष्यात लक्षणीय सकारात्मक बदल घडविला आहे.

अबीर म्हणाला, “मी सदैव श्री साई बाबांचा ऋणी राहीन कारण त्यांच्या कृपेशिवाय ही भूमिका मला मिळणे शक्य नव्हते. त्यांची जीवनगाथा टेलिव्हिजनवर सादर करणे ही फार मोठी जबाबदारी आणि सन्मान आहे. गेल्या वर्षभरात चित्रीकरणादरम्यान मला साई बाबांबद्दल अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या शिकवणीमुळे माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. मी पूर्वीपेक्षा शांत झालो आहे. जेव्हा कधी काही गोष्टी माझ्या मनासारख्या घडत नाहीत तेव्हा मी लगेच प्रतिक्रिया देत नाही तर त्या तशा न घडण्यामागील कारणाचा थोडा विचार करतो. ही आजपर्यंतची सगळ्यात चांगली गोष्ट झाली आहे. साई बाबांच्या अनंत कृपेची मला सदैव मदत झाली आणि मी प्रार्थना करतो की त्यांच्या कृपाशीर्वादाचा वर्षाव आपल्या सगळ्यांवर सतत होऊ दे.”

टॅग्स :मेरे साई मालिका