Join us  

मेरे साई या मालिकेत साईंची भूमिका साकारणारा अबीर सुफी आहे साईंचा भक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 11:54 AM

साई बाबांच्या जीवनविषयक शिकवणीने जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांना प्रभावित केले आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई ही मालिका त्यांच्या ...

साई बाबांच्या जीवनविषयक शिकवणीने जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांना प्रभावित केले आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई ही मालिका त्यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेचा उद्देश समस्त प्रेक्षकवर्गात दया आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार करणे हा आहे. शिर्डीच्या साई बाबांच्या भक्तांना त्यांनी केलेल्या अनेक चमत्कारांबद्दल माहिती आहे आणि त्यांनी दिलेल्या प्रेम आणि समानतेचा संदेश ते जाणतात. लोकांना झालेले रोग आणि आजार बरे करण्याबद्दल देखील साईबाबा ओळखले जायचे. एका दंतकथेनुसार साईंनी त्यांचे विश्राम स्थळ मशीद येथे एक अखंड ज्योत- धुनी तेवत ठेवली होती. ते बर्‍याचदा त्या धुनीतील विभूती घेऊन आपल्या अशा भक्तांना देत असत, जे गांजलेले असतील. लोक ही विभूती आपल्या विविध रोगांनी पीडित असलेल्या आप्तेष्टांसाठी देखील घेऊन जात असत. मेरे साई या मालिकेतील सध्या सुरू असलेले कथानक या धुनीच्या निर्मितीशी आणि त्या प्रांतातील भक्तांचे जीवन त्यामुळे कसे पालटले याच्याशी निगडित आहे. मेरे साई मालिकेत साई बाबांची भूमिका साकारणारा अबीर सूफी साईंचा निस्सिम भक्त आहे आणि तो स्वतः त्यांची विभूती नेहमी लावतो. याविषयी अबीर सूफी सांगतो, “साईंनी आपल्या भक्तांना मदत करण्यासाठी काही गूढ उपाय केले. आयुर्वेदिक औषधांनी ते घातक रोग बरे करत असत आणि नंतर ते विभूती देऊ लागले. मला आठवते आहे की मी जेव्हा जेव्हा शिर्डीला गेलो आहे, तेव्हा मी ती विभूती घेऊन आलो आहे आणि असा एकही दिवस उजाडलेला नाही, ज्यादिवशी मी ही विभूती लावल्या वाचून घराबाहेर पडलो असेन. साई बाबांनी म्हटले होते की, ही धुनी कालांतापर्यंत अशीच तेवत राहील. आजही शिर्डीला जाणारा प्रत्येक भक्त आपल्यासोबत विभूती घेऊन येतो. मेरे साईच्या सध्याच्या कथानकाने मी खूप रोमांचित आहे. कारण आम्ही धुनीची कहाणी आणि या धुनीचे भक्तांच्या जीवनात काय महत्त्व आहे, ते दाखवत आहोत.”Also Read : मेरे साई या मालिकेद्वारे मांडली जाणार पाणी टंचाईची समस्या