Join us

साधीभोळी महुआ झाली ‘बोल्ड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 09:06 IST

क्युट, साधी-भोळी ‘महुआ’ आठवते का? सतत पुस्तकात रमणारी, मोरयाच्या प्रेमात आकंठ बुडालेली, आई-बाबांची लाडकी ही महुआ आता बोल्ड झाली ...

क्युट, साधी-भोळी ‘महुआ’ आठवते का? सतत पुस्तकात रमणारी, मोरयाच्या प्रेमात आकंठ बुडालेली, आई-बाबांची लाडकी ही महुआ आता बोल्ड झाली आहे. शिवानी रंगोलेने आगामी ‘फुंतरू’ चित्रपटात बोल्ड भूमिका साकारली आहे.शिवानीने तिचा पहिला आॅनस्क्रिन किसिंग सीन केला आहे. याविषयी ती म्हणाली, ‘हा चित्रपट आजच्या काळातल्या महाविद्यालयीन तरुणाईच्या नात्याकडे बघण्याच्या वृत्तीवर भाष्य करणारा आहे. यातील माझ्या ‘श्रुती’च्या भूमिकेला एक किसिंग सीन करायचा होता. आमची डायरेक्टर आॅफ फोटोग्राफी अर्चना बोराडे आणि सुजयने तो सीन अतिशय छान चित्रित केलाय. यात कुठेही अश्लीलता वाटत नाही.’‘सीन करताना मनात थोडी धाकधूक होती. एक तर माझा पहिला किसिंग सीन होता. दुसरी गोष्ट म्हणजे, आपण असे सीन जरी बॉलीवूडमध्ये सर्रास पाहात असलो, तरीही आपल्या मराठी सिनेमात असे सीन नेहमी दिसत नाहीत, ते थोडं धाडसाचं पाऊल होतं,’असेही ती पुढे म्हणाली.