Join us  

रुपाली भोसलेच्या वाढदिवसाचं सेटवर जंगी सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 12:13 PM

नुकतेच २९ डिसेंबरला रुपालीचा वाढदिवस झाला.

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून अनेक कलाकार नवारुपाला आले आहेत. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.  या मालिकेत संजना ही भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे रुपालीचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच २९ डिसेंबरला रुपालीचा वाढदिवस झाला. पण या वाढदिवसाचे सेलिब्रेशन अजूनही सुरू आहे.  ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार मंडळींनीही अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा केला. 

रुपालीने इन्स्टाग्रामवर सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला. तिनं लिहले,'धन्यवाद मित्रांनो…वाढदिवस संपला? तर मुळीच नाही…'आई कुठे काय करते’च्या सेटवर मी माझा चौथा वाढदिवस साजरा झाला. याचा अर्थ या प्रवासाला चार वर्ष झाली. धन्यवाद संजना, या सुंदर प्रवासासाठी. माझ्या हृदयाच्या खूप जवळचा हा प्रवास आहे'.

पुढे तिने लिहलं, 'मला संजना भूमिका साकारायला खूप आवडतं आणि मला यातून खूप आनंद मिळतो. संजनामध्ये मी आता मानसिक, शारीरिक, आत्म्याने गुंतून गेली आहे. जेव्हा मी नवीन सीन करते,तेव्हा आधीचा माझा प्रत्येक सीन पुसून टाकण्याचा प्रयत्न करते आणि नवीन दृष्टीकोनातून तो करण्याचा प्रयत्न करते. नेहमी माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असतो. आय लव्ह यू संजना'.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रुपाली भोसले हिने हिंदी व मराठी मालिकेत काम केले आहे. मात्र तिला 'आई कुठे काय करते' या मालिकेतील संजनाच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली.  तसेच रुपाली 'बिग बॉस मराठी' या शोमध्येदेखील सहभागी झाली होती. त्यावेळी ती खूप चर्चेत आली होती.

टॅग्स :रुपाली भोसलेसेलिब्रिटीमराठी अभिनेताआई कुठे काय करते मालिका