Join us

मानसी मॉर्डन आईच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 13:06 IST

प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा या मालिकेत मानसी साळवी आणि नकुल मेहता यांनी एकत्र काम केले होते. ...

प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा या मालिकेत मानसी साळवी आणि नकुल मेहता यांनी एकत्र काम केले होते. ते दोघे पुन्हा एकदा आता इश्कबाज या मालिकेत झळकणार आहे. इश्कबाज या मालिकेत प्रेक्षकांना ऑबेरॉय कुटुंबाची कथा पाहायला मिळत आहे. या मालिकेत आता सिद्धार्थ राणा म्हणजेच शालीन मल्होत्राच्या आईच्या भूमिकेत मानसीची एंट्री होणार आहे. ती एक प्रसिद्ध उद्यागपती असून तिच्या एंट्रीनंतर मालिकेत सिद्धार्थ आणि मल्लिकाच्या कथेवर अधिक प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या मालिकेतील मानसीचा लुक हा खूपच मॉर्डन असणार आहे.