Join us  

ऋतुजा बागवेच्या या फोटोवर सामान्यच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील झाले फिदा, केल्या अशा कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 2:20 PM

फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋतुजा बागवे नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका,आगामी प्रोजेक्टस यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सोशल मीडियावर ऋतुजा तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घालायला सुरूवात केली आहे. चाहत्यांसह सेलिब्रेटी मंडळी देखील तिच्या लुक्सच्या प्रेमात पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.नैणों की मत माणियो रे नैणों की मत सुणियो नैणा ठग लेंगे असं कॅप्शन तिने हा फोटो शेअर करतना दिले आहे. फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अमृता खानविलकरने उफ्फफ, स्वानंदी टीकेकरने ओहो तर सुबोध भावेने हार्टचा इमोजी पोस्ट केला आहे.  अनेक सेलिब्रेटींनी तिच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. 

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ऋतुजा बागवे सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. विशेष म्हणजे 'नांदा सौख्य भरे' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री करत रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. सध्या ती सुबोध भावेसोबत चंद्र आहे साक्षीला मालिकेत झळकते आहे.  

टॅग्स :ऋतुजा बागवे