ऋता दुर्गुळेने असा साजरा केला 'गुढीपाडवा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 10:30 IST
सतत लाईट, कॅमेरा आणि अॅक्शनच्या झगमगाटात राहणारे हे कलाकार कधी वेळ मिळालाच तर मस्त एन्जॉय करताना दिसतात.कलाकारांना त्यांच्या बिझी ...
ऋता दुर्गुळेने असा साजरा केला 'गुढीपाडवा'
सतत लाईट, कॅमेरा आणि अॅक्शनच्या झगमगाटात राहणारे हे कलाकार कधी वेळ मिळालाच तर मस्त एन्जॉय करताना दिसतात.कलाकारांना त्यांच्या बिझी शेड्युल्डमुळे स्वत:साठी सहसा वेळ मिळत नाही.फोटोत ती मस्त निवांत एन्जॉय करताना दिसतेय.“गुढीपाडवा म्हणजे आपले नवीन वर्ष. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत व्हावे यासाठी सर्वचजण तयारी करत असतात. गुढी खरं तर आनंदाचे प्रतिक असते. नवीन वर्षाची एक नवी सुरुवात आपण या दिवशी करत असतो.आनंदाची, प्रेमाची, नव्या सकारात्मत विचारांची आणि नव्या संकल्पांची गुढी आपण जर उभारली तर ख-या अर्थाने आपण गुढीपाडवा साजरा करतो, असं म्हणायला हरकत नाही.माझ्या घरी अगदी पारंपारिक पध्दतीने गुढीपाडवा साजरा केला जातो.गुढीपाडवाच्या दिवशी सर्वजण घरी असतात त्यामुळे सर्वांच्या उपस्थितीत गुढी उभारली जाते.आई छानपैकी नैवेद्याचं जेवण तयार करते, ज्याची चव चाखण्यास आम्ही सर्वजण आतूर असतो. यावर्षी मालिकेच्या शूटिंगपासून रजा घेतली असल्यामुळे मी भावंडं, आई-बाबा असे आम्ही एकत्र या सणाचा आनंद लुटणार आहे. तसेच नवीन वर्षाचे पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यासाठी शोभायात्रा काढल्या जातात आणि यंदाच्या वर्षी मी गिरगांव, वरळी आणि लोअर परळ येथील शोभायात्रेत सामील होणार आहे.या नवीन वर्षाचा माझा संकल्प हाच असेल की, मी प्रेक्षकांना भूमिकेच्या माध्यमांतून सतत नवनवीन देण्याचा प्रयत्न करेन. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी मला त्यांचे प्रेम दिले आहे आणि पाठिंबा दर्शविला आहे, जो विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला आहे त्याप्रती मला नेहमीच आदर राहिल. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील जे एक सुंदर नातं असतं ते जपण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन.”गुढीपाडव्याचा दिवशी त्याची इन्सपिरेशन असलेल्या वैदेही समोर असताना अचानक मानसला हे गाणं सुचतं. फुलपाखरूच्या प्रेक्षकांसाठी या नव्या गाण्याची पर्वणी असणार आहे.तिथे माया मानसला वैदेहीपासून वेगळं करण्यासाठी तान्या आणि रॉकीला हाताशी धरून नवनवीन चाली खेळत असते.मानसचं गाणं हे बॅण्डचं गाणं होऊ शकेल का? या गाण्याने दोस्ती बॅण्ड रॉकीला हरवू शकेल का? वैदेहीने घेतलेल्या चेलेंजमध्ये ती कितपत यशस्वी होऊ शकेल? माया वैदेहीला हरवण्यासाठी कुठला नवीन डाव खेळेल?हे पाहणे रंजक ठरणार आहे.