चिडिया घर या मालिकेत रितेश देशमुखने केले बँकचोरचे प्रमोशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 12:55 IST
बँकचोर या चित्रपटात रितेश देशमुख आणि विवेक ऑबेरॉय प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. सध्या ते दोघेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन ...
चिडिया घर या मालिकेत रितेश देशमुखने केले बँकचोरचे प्रमोशन
बँकचोर या चित्रपटात रितेश देशमुख आणि विवेक ऑबेरॉय प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. सध्या ते दोघेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कुठेही कोणतीही कमतरता येऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत. रितेश तर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कार्यक्रमात हजेरी देखील लावत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तो काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ढोलकीच्या तालावरच्या सेटवर गेला होता.रितेश देशमुख नुकताच चिडिया घर या मालिकेत आला होता. या मालिकेत त्याने बँकचोर या चित्रपटाचे प्रमोशन केले. या मालिकेच्या सेटवर येऊन तो खूपच खूश झाला होता. कारण या मालिकेचा तो चाहाता असून या मालिकेतील व्यक्तिरेखांची आगळीवेगळी नावे त्याला खूपच आवडतात. त्याने या मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी खूप धमाल मस्ती केली. चिडिया घर मधील सदस्यांच्या घरी तो एका विशेष कारणासाठी आला होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तो चिडिया घर मध्ये चोरी करण्यासाठी येणार आहे. तो त्याच्या चोरीत यशस्वी होतो की नाही हे मालिका पाहिल्यावरच तुम्हाला कळणार आहे. याविषयी रितेश सांगतो, चिडिया घर ही मालिका खूपच प्रसिद्ध आहे. ही मालिका मी अनेक वेळा पाहिली आहे. त्यामुळे मालिकेच्या टिमसोबत काम करायला मला खूपच मजा आली. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखांची नावे मला खूप आवडतात. मी कशाप्रकारे चोरी करतो, माझी चोरी पकडली जाते की नाही हे प्रेक्षकांना चिडिया घरमध्ये पाहायला मिळणार आहे.