रिंगण, हलाल,वक्रतुंड महाकाय जाणार कान फेस्टीव्हलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 09:52 IST
नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, रंगापतंगा, हलाल, कौल, दि सायलेन्स, वक्रतुण्ड महाकाय या चित्रपटातून बाजी मारत रिंगण, हलाल आणि वक्रतुंड ...
रिंगण, हलाल,वक्रतुंड महाकाय जाणार कान फेस्टीव्हलमध्ये
नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, रंगापतंगा, हलाल, कौल, दि सायलेन्स, वक्रतुण्ड महाकाय या चित्रपटातून बाजी मारत रिंगण, हलाल आणि वक्रतुंड महाकाय हे तीन चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय फेस्टीव्हलमध्ये जाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. या चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी झी चित्रगौरव सोहळा, राष्ट्रीय पुरस्कार आणि राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा यासाठी काम केलेल्या नामवंत परीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या तीन चित्रपटांपैकी एखाद्या चित्रपटाच्या सहभागाबाबत काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून दि सायलेन्स या चित्रपटाची निवड देखील समितीने करून ठेवली आहे. हा कान आंतरराष्ट्रीय फेस्टीव्हल १६ ते १८ मे या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये या तीन चित्रपटांचे स्क्रिनिंग प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण ६ खेळ होणार आहेत. चला तर, या कान्स आंतरराष्ट्रीय फेस्टीव्हलमध्ये हे मराठी चित्रपट नक्कीच मराठी झेंडा फडकवतील यासाठी शुभेच्छा देऊयात.