Join us  

एकता कपूरचा आणखीन एक Bold Content, पहायला मिळणार दोन महिलांची प्रेमकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 1:25 PM

एकता कपूर घेऊन आली आहे समलैंगिक प्रेमकथा

देशभरात घराघरात तुलसी व पार्वतीसारख्या सूनांची कथा पोहचवणारी टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरचा एडल्ट कॉन्टेंटकडे कल वळत असल्याचं पहायला मिळत आहे. ऑल्ट बालाजीच्या गंदी बातसारख्या सीरिजनंतर आता एकता आणखीन एक हटके विषय घेऊन खळबळ माजवणार आहे. एकताने नव्या वेबसीरिजची घोषणा केली आहे. या वेबसीरिजमध्ये दोन महिलांची प्रेमकथा पहायला मिळणार आहे जीची पार्श्वभूमी अयोध्या वादावर आहे.

एकता कपूरची ही मालिका अशा दोन महिलांवर आधारीत असेल जे भारताची संस्कृती व समाजाचा विचारांना न जुमानता समलैंगिक प्रेमाचा विजय करतात. या मालिकेची घोषणा खुद्द एकताने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून सांगितली. 

मंजू कपूर लिखित चर्चेत आलेली कथा ए मॅरीड वूमनवर आधारीत ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये रिद्धी डोगरा व मोनिका डोगरा मुख्य भूमिकेत आहे.

एकताने ट्विटरवर लिहिले की, सीमा कित्येकदा कलेला बंधनांमध्ये बांधून ठेवते.

एक निर्मात्याच्या भूमिकेत या मर्यादांना आव्हानं दिलेली आहेत. हे एक स्वातंत्र्य आहे ज्याची मज्जा घेण्यासाठी आपण तरसत असतो. मला हे माहित आहे की स्वातंत्र्य जबाबदारीसोबत येते. 

टॅग्स :एकता कपूररिद्धी डोगरा