रिध्दिमा तिवारीच्या कट्टर चाहत्याने तिचे नाव गोंदवून घेतले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2017 12:25 IST
छोट्या पडद्यावरील कलाकार मालिकेच्या माध्यमातून रसिकांचे न चुकता रोज मनोरंजन करत असतात. मालिकेच्या निमित्ताने घराघरांत पोहचलेले ही कलाकार मंडळी ...
रिध्दिमा तिवारीच्या कट्टर चाहत्याने तिचे नाव गोंदवून घेतले!
छोट्या पडद्यावरील कलाकार मालिकेच्या माध्यमातून रसिकांचे न चुकता रोज मनोरंजन करत असतात. मालिकेच्या निमित्ताने घराघरांत पोहचलेले ही कलाकार मंडळी प्रत्येकालाच आपलेसे वाटू लागतात. त्यामुळे कधी आपल्या आवडत्या कालकारांना भेटण्याची संधी मिळाली तर त्या संधीचे सोनं करण्यात काहीही कमी ठेवत नसल्याचे चाहते दिसतात. असाच एका चाहत्याला त्याची फेव्हरेट अभिनेत्री रिध्दीमा तिवारीला भेटण्याची संधी मिळाली.‘गुलाम’ मालिकेत माल्दावाली या मादक स्त्रीची भूमिका रिध्दिमा साकारत आहे. ऋषभ मित्तल नावाच्या तिच्या एका चाहत्याने मालिकेच्या सेटवर नुकतीच भेट घेतली.या मालिकेच्या सेटवर येताच ऋषभ रिध्दीमा समोर पाहून खूपच खुश झाला.त्यानंतर रिध्दीमासह त्याने थेट रिध्दिमाची मेक- अप रूमच गाठली. दोघांनीही खूप गप्पा मारल्या या दरम्यान रिध्दीमाला ऋषभच्या हातावर आपले नाव गोंदल्याचे पाहून आश्चर्यच वाटले.रसिक इतके भरभरून आपल्यावर प्रेम करत असल्याचे पाहून ती भावूक झाली होती. याविषयी रिध्दिमाने सांगितले की, “मालिकेतली माल्दावाली या माझ्या भूमिकेची प्रशंसा होत असून चाहत्यांमध्ये बहुसंख्य चाहते हे पुरुष आहेत, हे पाहून खूप आनंद झाला आहे. विशेष म्हणजे या तरुण चाहत्याच्या हातावर माझं नाव गोंदलेलं पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला, पण नंतर मला खूप बरंही वाटलं. सामान्यत: माणसं आपल्या निकटच्या व्यक्तीचं नाव आपल्या हातावर किंवा शरीरावर गोंदवून घेतात; परंतु त्याच्या हातावर माझं नाव माझ्या मनाला स्पर्श करून गेले.” या तरूण चाहत्याने आपल्यासाठी घेतलेले कष्ट बघून रिध्दिमाने सेटवर त्याच्यासाठी जेवण मागवले आणि शूटिंगमध्ये मिळालेल्या वेळेत तिने या चाहत्याशी खूप सा-या गप्पा मारल्या. नेहमीच चाहत्यांचे हे प्रेम मला आणखीन चांगले काम करण्याची उर्जा देत राहतील असे यावेळी रिध्दीमाने सांगितले.