Join us

रिचा वेशभूषेच्या प्रेमात पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 13:55 IST

रिचा मुखर्जीने कुककुम या मालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान, सूर्यपुत्र करण ...

रिचा मुखर्जीने कुककुम या मालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान, सूर्यपुत्र करण यांसारख्या मालिकेत झळकली. आता रिचाची लवकरच नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत एंट्री होणार आहे. रिचाची या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वी लुक टेस्ट झाली असून लवकरच ती चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. याविषयी रिचा सांगते, "मी या मालिकेत नागकन्येची भूमिका साकारणार असून ती अर्जुनला आपल्याकडे अाकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. या मालिकेत काम करण्यास मी खूपच उत्सुक आहे. या मालिकेतील माझी वेशभूषा, दागिने यांच्या मी प्रेमात पडली आहे. त्यामुळे या मालिकेचे चित्रीकरण कधी सुरू होत आहे याची मी आतुरतेने वाट पाहात आहे."