Join us  

रेमो डिसुझाच्या आयुष्यात 'ही' व्यक्ती आहे सुपरवुमन, नाव वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 6:30 AM

बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरियोग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसुझा आणि त्याची पत्नी लिझेल यांची प्रेमकथा डान्स प्लस ४च्या मंचावर पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देलिझेलने माझ्यावर नेहमीच प्रचंड विश्वास ठेवला - रेमोलिझेलने रेमोला दोनदा दिला होता नकार

बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरियोग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसुझा आपल्या खासगी आयुष्याबद्दल फारसे बोलताना दिसून येत नाही आणि बऱ्याच जणांना हे ठाऊक नसेल की तो आणि त्याची पत्नी लिझेल हे कशाप्रकारे एकमेकांना भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. ही गोष्ट 'डान्स प्लस ४'च्या मंचावर अक्षरशः जिवंत झाली. 

फील क्रूने सुपरजज रेमो स्पेशल एपिसोडमध्ये केवळ संवादांवर डान्स केला आणि त्यातून रेमो आणि लिझेल यांचा १९ वर्षांचा जीवनप्रवास आणि सहवास आपल्या ॲक्टमधून व्यक्त केला. या परफॉर्मन्सबद्दल रेमो म्हणाला, “माझ्या पत्नीसोबतच्या १९ वर्षांच्या माझ्या सगळ्‌या आठवणी हा परफॉर्मन्स पाहताना अक्षरशः जीवंत झाल्या.” यातील एका गोष्टीने रेमोला थक्क केले आणि ती म्हणजे लिझेलने प्रथमच ह्या ग्रुपच्या परफॉर्मन्ससाठी ह्या ॲक्टमधील संवादांसाठी नरेटर म्हणून व्हॉईस ओव्हर दिला. त्यांनी हे प्लानिंग रेमोपासून त्याला सरप्राईज देण्यासाठी लपवून ठेवले होते. जेव्हा रेमो प्रथम कोरियोग्राफर अहमद खानसोबत सहाय्यक म्हणून काम करत होता, तेव्हा तो प्रथम लिझेलला भेटला, आणि तेव्हापासूनच ह्या ॲक्टची सुरूवात झाली. लिझेलही तेव्हा एक डान्सर म्हणून काम करत होती. सुरूवातीला ते दोघेही एकमेकांना नापसंत होते कारण रेमो तिला अनेकदा सरावासाठी उशीरा आल्याबद्दल सुनवत असे आणि अतिशय शिस्तीने वागत असे. नंतर हळूहळू ते दोघे एकमेकांना आवडू लागले आणि मग रेमोने तिला दोन वेळा प्रपोज केला आणि तिने दोन्ही वेळा त्याला नकार दिला. पण पुढे तिला त्याच्याविषयीचे आपले प्रेम जाणवू लागले आणि मग तिसऱ्या वेळी तिने त्याला प्रपोज केले. रेमो म्हणाला, “आम्ही बरेच तरूण असताना लग्न केले. मी इंडस्ट्रीत स्थिरस्थावर होण्यासाठी प्रयत्न करत होतो. आम्ही दोघेही स्ट्रगल करत होतो. पण लिझेलने माझ्यावर नेहमीच प्रचंड विश्वास ठेवला, कायम मला समर्थन दिले आणि ह्या प्रवासात मला प्रेरणा दिली. आम्ही सगळे अडथळे एकत्र पार केले.” जेव्हा त्यांचे मुलगे ध्रुव आणि गॅब्रिएल रेमोला भेटण्यासाठी सेटवर आले तेव्हा तर रेमो खूपच खुश झाला. वडिलांच्या रूपात रेमोबद्दल बोलताना मोठा मुलगा ध्रुव म्हणाला की त्यालाही त्याच्या बाबांप्रमाणे दिग्दर्शक बनायचे आहे. रेमो म्हणाला, “लिझेल माझी पत्नी आहे, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. तिने मला नेहमीच माझा हात धरला आहे. आजही तीच माझा आधार आहे आणि तिने माझ्यावर आयुष्याच्या प्रत्येक क्षणी केवळ प्रेम केले आहे. माझी पत्नी जणू एक सुपरवुमन आहे. ती घर, मुले, ऑफिस आणि फिल्म्स अगदी सगळं काही उत्तमप्रकारे सांभाळते. मी तिचे मनापासून आभार मानतो.” 

टॅग्स :डान्स प्लस 4रेमो डिसुझा