Join us  

‘राधाकृष्ण’ पौराणिक मालिकेच्या सेटवर 'हे' टीव्ही कपल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:01 PM

‘राधाकृष्ण’ या पौराणिक मालिकेच्या सेटवर लव्ह इज इन द एअर अशीच काहीशी परिस्थिती सेटवर निर्माण झाल्याच्या खुमासदार चर्चा सध्या रंगल्या आहेत.

‘राधाकृष्ण’ या पौराणिक मालिकेच्या सेटवर सध्या प्रेमाची जादू पाहायला मिळत आहे. लव्ह इज इन द एअर अशीच काहीशी परिस्थिती सेटवर निर्माण झाल्याच्या खुमासदार चर्चा सध्या रंगल्या आहेत. मालिकेला सध्या प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. सध्या सा-यांचे चर्चेचे विषय ठरले आहेत.  या मालिकेतील राधा आणि कृष्णाची भूमिका साकारणारे मल्लिका सिंह आणि सुमेध मुदगलकर. यांच्यात सध्या रियल लाइफ लव्ह स्टोरी रंगत असल्याचं ऐकायला मिळत आहे. मालिकेच्या सेटवर  दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी चांगल्याच रंगत असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. 

दोघांमधील हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट बनत चाललं आहे. निव्वळ मैत्री या शब्दांपलीकडे या दोघांच्या नात्याकडे पाहिलं जात आहे. यांच्यातील संबंध हे केवळ व्यावसायिक सहकलाकार इतक्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते अधिक जवळ आले आहेत. त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांची ही घनिष्ठ मैत्री अनेक वर्षे कायम राहील असे जाणवते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही सेटवर असताना एकमेकांच्या नजरेपासून दूर जात नाहीत. दोघेही दुपारचे जेवण एकत्रच करतात.

सुमेध आणि मल्लिका यांच्यात कायम विनोद आणि थट्टामस्करी सुरू असते. एकमेकांसाठी खूप स्पेशल असल्याची कबूली दोघांनीही दिली आहे. असं असलं तरी आपण फक्त आणि फक्त चांगले मित्र असल्याचे हे दोघं सांगत असतात. आम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलो आहोत मात्र ते प्रेमाच्या नात्याने नसून तर मैत्रीच्या नात्याने असे सुमेधने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या दोघांत प्रेमाची खिचडी शिजतेय की नाही हे सांगणं थोडं कठीणच आहे. 

सुमेधने पूर्वीही एका पौराणिक मालिकेत भूमिका साकारल्याने तो मल्लिकाला या मालिकेत आपली भूमिका अधिक चांगली साकारता यावी यासाठी तो तिला  मदतही करत असतो. कारण मल्लिकाची ही पहिलीच पौराणिक मालिका आहे. या दोघांमधील हे नाजूक प्रेमाचे प्रतिबिंब मालिकेतील त्यांच्या भूमिकांमध्येही पडलेले दिसते आणि त्यावर प्रेक्षक मोहित झाले आहेत.

टॅग्स :सुमेध मुदगलकरराधा कृष्ण