Join us

​या कारणामुळे सिद्धार्थ शुक्लाला दिल से दिल तकच्या सेटवरून काढण्यात आले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 12:10 IST

सिद्धार्थ शुक्ला दिल से दिल तक या मालिकेत पार्थ भानुशाली ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेच्या सेटवर नुकताच खूप ...

सिद्धार्थ शुक्ला दिल से दिल तक या मालिकेत पार्थ भानुशाली ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेच्या सेटवर नुकताच खूप मोठा तमाशा झाला. या मालिकेत अमनची भूमिका साकारणारा कुणाल वर्मा याच्यासोबत गैरवर्तन केल्याबद्दल सिद्धार्थला निर्मात्यांनी ही मालिका सोडायला सांगितली आहे. सिद्धार्थ अनेक दिवसांपासून कुणालसोबत खूपच वाईट वागत होता. तसेच त्यावर अनेक कमेंट पास करत होता. त्यामुळे शेवटी कंटाळून कुणालने याबाबत निर्मात्यांना तक्रार केली. निर्मात्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सिद्धार्थला त्याच्या वागणुकीसाठी माफी मागायला सांगितली. पण कुणालची माफी मागायला सिद्धार्थ तयारच नव्हता. या उलट अनेक निर्माते त्याच्यासोबत काम करण्यास उतावीळ असल्याचे त्याने निर्मात्यांना म्हटले असल्याची चर्चा आहे. सिद्धार्थने प्रोडक्शन टीमसोबत देखील या प्रकरणावरून भांडणे केल्यानंतर त्यांनी सिद्धार्थची तक्रार कलर्स वाहिनीकडे केली आहे. सिद्धार्थ मालिकेत असल्यास कोणताही कलाकार अथवा टीममधील सदस्य चित्रीकरण करणार नसल्याचे मालिकेच्या टीमने वाहिनीला सांगितले आहे. सिद्धार्थने याआधी देखील मालिकेच्या सेटवर अनेकवेळा भांडणं केली आहेत. त्याने मालिकेचे चित्रीकरण कोणत्या ना कोणत्या कारणांनी अनेकवेळा थांबवून ठेवले आहे. रश्मी देसाई या मालिकेत सिद्धार्थसोबत प्रमुख भूमिकेत झळकत आहे. तिची व्हॅनिटी सिद्धार्थपेक्षा मोठी असल्याने सिद्धार्थने यावर प्रोडक्शन टीमला तक्रार केली होती आणि जोपर्यंत तिच्यापेक्षा मोठी व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करणार नाहीत, तोपर्यंत चित्रीकरण करायचे नाही असे देखील ठरवले होते. रश्मीसोबत देखील त्याचा अनेक वेळा वाद झाला आहे. त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्मात्यांनी ठरवले आहे.Also Read : जास्मिन भसीनला या कलाकाराची वाटायची भीती?