या कारणामुळे मोहसिन ये रिश्ता क्या कहलाता हैच्या सेटवरून चिडून निघून गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 15:10 IST
ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका एकेकाळी नंबर वनवर होती. या मालिकेतील अक्षरा आणि नैतिकची जोडी तर प्रेक्षकांची ...
या कारणामुळे मोहसिन ये रिश्ता क्या कहलाता हैच्या सेटवरून चिडून निघून गेला
ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका एकेकाळी नंबर वनवर होती. या मालिकेतील अक्षरा आणि नैतिकची जोडी तर प्रेक्षकांची जीव की प्राण होती. पण काही महिन्यांपूर्वी या मालिकेत नैतिकची भूमिका सोडणाऱ्या करण मेहराने मालिकेला रामराम ठोकला आणि आता अक्षराच्या भूमिकेत झळकणाऱ्या हिना खाननेदेखील ही मालिका सोडली आहे. त्यामुळे या मालिकेच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला आहे. तसेच या मालिकेत त्यांच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या रोहन मेहराने ही मालिका सोडून बिग बॉसमध्ये प्रवेश केला आहे. महत्त्वाचे कलाकार ही मालिका सोडत असल्याने प्रोडक्शन टीम चांगलीच टेन्शनमध्ये आली आहे. कलाकारांनी मालिका सोडू नये यासाठी त्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच या मालिकेत कार्तिकची भूमिका साकारणारा मोहसिन खान काही दिवसांपूर्वी चिडून मालिकेच्या सेटवरून निघून गेला अशी चर्चा आहे. मोहसिन या मालिकेत नैराच्या म्हणजेच शिवांगी जोशीच्या प्रियकराची भूमिका साकारतो. काही दिवसांपूर्वी त्याला देण्यात आलेल्या कॉश्च्युमवरून त्याचा प्रोडक्शन टीमसोबत वाद झाला. मोहसिन इतका चिडला की, रागात तो सेटवरून निघून गेला. त्यामुळे त्या दिवसातील त्याचे चित्रीकरण होऊ शकले नाही. एवढेच नव्हे तर तो दुसऱ्या दिवशीही सेटवर आला नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा फोन लागतच नव्हता. त्यामुळे शेवटी टीममधील काहीजण त्याच्या घरी गेले आणि त्यांनी त्याला पुन्हा येण्यासाठी तयार केले. आता त्याचे प्रोडक्शन हाऊससोबत वाद मिटले असून सगळे काही सुरळीत सुरू असल्याचे म्हटले जात आहे.