Join us  

'या' कारणामुळे हुमा कुरेशी झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 1:49 PM

‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ हा कार्यक्रम आता उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे स्पर्धा आता अटीतटीची झाली आहे. येत्या शनिवारी, एव्हरग्रीन अभिनेता गोविंदा आणि वरुण शर्मा हे सेलिब्रिटी अतिथी म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

ठळक मुद्दे ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ कार्यक्रम आता उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचला आहेप्रत्येक स्पर्धक आपला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतोय

लहान मुलांमधील अभिनयगुणांचा शोध घेणारा ‘झी टीव्ही’वरील ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ हा कार्यक्रम आता उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे  स्पर्धा आता अटीतटीची झाली आहे. येत्या शनिवारी, एव्हरग्रीन अभिनेता गोविंदा आणि वरुण शर्मा हे सेलिब्रिटी अतिथी म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक शंतनू माहेश्वरीने परीक्षकांना या उपान्त्य फेरीच्या निर्णयाविषयी विचारले, तेव्हा एक परीक्षक हुमा कुरेशी अतिशय भावूक झाली आणि तिने आतापर्यंत आलेल्या आपल्या अनुभवाविषयी आणि या प्रवासाविषयी काही सांगितले. हुमा म्हणाली, “गेल्या तीन महिन्यांत मी या लहान बाल अभिनेत्यांकडून बरंच काही शिकले आहे. ही छोटी मुलं- कलाकार किती बिनधास्त आणि लाघवी आहेत, आम्ही सारेजण एका मोठ्या कुटुंबाचा भाग बनलो होतो. मी प्रथमच टीव्हीवरील एखाद्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी झाले होते आणि हा अनुभव फार छान आणि मजेदार होता. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी मी इतकी धास्तावलेली होते, पण हळूहळू माझी भीती कमी झाली.”

आपल्या सहपरीक्षकांबद्दल हुमा म्हणाली, “पहिल्यांदा मला वाटलं की उमंग हा फार कठोर आणि शिस्तप्रिय व्यक्ती असेल आणि मला त्याला नेहमी सर म्हणून संबोधावं लागेल. पण त्याच्याशी जसजशी ओळख वाढत गेली तसतसं मला जाणवलं की तो एक सहृदय माणूस आहे. विवेक ओबेरॉयने परीक्षक म्हणून काम कसं करायचं, याचं मार्गदर्शन मला केलं. मी शंतनूची नेहमीच थट्टामस्करी केली पण तोसुध्दा खूप आवडेल अशी व्यक्ती आहे.” या वीकेण्डच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना खूप काही पाहायला मिळणार आहे, कारण त्यात अनेक उत्कृष्ट नाट्यप्रवेश सादर केले जाणार आहेत. विष्णू आणि शिवशंकर यांच्यावर एक नाट्यप्रवेश सादर करून आर.एस. श्रीशा आणि सोहम यांनी परीक्षकांची वाहवा मिळविली; तर अँजेलिका आणि हर्षराज लकी यांनी प्रेमळ गायक आणि महिला पोलिस निरीक्षक यांच्यातील विनोदी प्रसंग सादर करून सर्वांना जोरात हसविले. यानंतर गोविंदा आणि वरूण शर्मा यांनी या लहान ड्रामेबाझ मुलांबरोबर भरपूर गप्पा मारून धमाल केली. 

टॅग्स :हुमा कुरेशीविवेक ऑबेरॉय